समीरा आज लवकरच पार्लर मध्ये आली होती...तिला पाहून सर्वजण चकित झाले होते....सर्वजण तिच्याकडे डोळे मोठे करून पाहत होते...???
"काय ग चारू आज सूर्य पश्चिमेला उगवल की काय ...?" रिकु ( स्टाफ)
" हा ...रिकू मलाही असाच वाटतंय.....नाहीतर कदाचित समी( समीरा) मॅडम ची तब्येत ठीक नाही??...कारण त्या आज लवकर आल्या आणि त्याही एवढी मोठी थैली घेऊन....?"चारू
समिने सगळ्यांकडे एक नजर मारली आणि आपल्या काऊंटर वर गेली...तिची थैली तिथेच ठेवली आणि तिने तिच्या कस्टमर चा मेकअप करायला घेतला....तसे सर्वजण पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाले....कुणाचं लक्ष नाही अस पाहून ती थैली घेऊन आतल्या खोलीत नेले तिने हळूच दरवाजा उघडला आणि आत आली...
हळूच दरवाजा लावला.
गार्गी शांत झोपली होती. समी गार्गी च्या जवळ आली....तिने एकवार तिच्या कडे पाहिले....गार्गी चा चेहरा पूर्ण उतरला होता....तिच्या चेहऱ्यावर मारलेल्याचे वळ होते...समी ने हळू तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि लगेच बाजूला काढला....तिच्या हाताला चटका लागला....
"अरे बापरे हिला तर ताप आलाय...." तिने गार्गी ला उठवलं.
" गार्गी..ये गार्गी....उठ चल...काहीतरी खाऊन घे...." गार्गी डोळे चोळत उठली....तिने आजुबाजुला पाहिले....आणि समि कडे पाहिले...कदाचित तिला अजूनही विश्वास बसला नव्हता की ती त्या हरमीच्या जाळ्यातून सुटली....ती फ्रेश व्हायला बाथरुम मध्ये गेली.
बाहेर येताच संमी ने आणलेला नाश्ता तिला दिला ...
" गार्गी आपण डॉक कडे जाऊ...तुला ताप आलाय...." सामी (समीरा)
"नाही नको....मी ठीक आहे...थोडा आराम करेन तर बर वाटेल .." गार्गी
"ते काही नाही....आपण जाणार आहोत....तू एक काम कर अंघोळ कर आणि हे कपडे घाल...मी आलेच..." सामी ने तिला कपडे दिले आणि ती बाहेर निघून गेली. गार्गी थोड्याच वेळात अंघोळ करून बाहेर आली ...दोघेही पार्लरच्या मागच्या बाजूने डॉक कडे गेल्या.
वेद सकाळी रोजच्या प्रमाणे उठला....त्याने जॉगिंग केली....आणि जिम करून तो तयार व्हायला गेला.
अंघोळ करून तो बाहेर आला तो त्याचा फोन वाजत होता...त्याने रिसिव्ह केला आणि थोडावेळ बोलून ठेवून दिला. त्याला त्याच्या एका मित्राला भेटायला जायचे होते जो त्याला कॉफी शॉप मध्ये भेटणार होता.
त्याने फॉर्मल ब्लॅक शर्ट घातला होता....पिळदार बॉडी ....थोडे वाढलेले केस आणि दाढी यामध्ये तो एकदम हँडसम दिसत होता....
त्याने एकदा स्वतःला आरशात पाहिले

"Parfect".... वेद
त्याने त्याची कार काढली....आणि कॉफी शोपमधे आला.
त्याने शॉप मध्ये एंट्री केली तास तिथे असणाऱ्या सर्व मुली त्याच्या कडे टकमक पाहतच राहिले....??
वेद ने कॉफी शॉप मध्ये नजर फिरवली....एक गोड हास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरले....त्याचं ते हसू पाहून चार पाच जनी तर अशाच फ्लॅट झाल्या...तो जसजसा आत येत होता तसतशा सर्व मुलींच्या माना त्याला पाहत फिरत होत्या.
वेद एक टेबलाकडे येऊन थांबला...
"Hi... रोहन...कसा आहेस यार...."वेद
"Hey... वेद...मी मस्त...तू कसा आहेस ..?" रोहन
"मी पण एकदम झक्कास ..?" वेद
दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले.
"बोल काय घेणार आहेस......?"रोहन
"कॉफी..."वेद
"वेटर... टू कॉफी...plz" रोहन
"काय मग कसं चाललंय...शेतिभाती....?"रोहन
"चाललीये तुमच्या कृपेने ..बर तू ज्या कामासाठी अलायास ये काम करून घेऊ...." वेद
"हो नक्कीच....ही घे फाईल.. या फाईल मध्ये जमिनीबाबत सर्व माहिती आहे...."रोहन
वेद ने फाईल घेतली. त्याने नीट फाईल वाचली ..तो डोळे बंद करून विचार करत होता...
"जमीन तर ठीक वाटतेय...काय करू...रस्त्याच्या जवळ आहे ...लाईट ...पाणी ....याचाही टेन्शन नाही ...माझ्या नर्सरी कम लॅब साठी एकदम परफेक्ट ....ठीक आहे....पण ...एकदा जागा बघून नंतरच ठरवेन....चालेल ना...." वेद
"हो...हो....चालेल..."रोहन हसतच म्हणाला
"सर तुमची कॉफी ...." वेटर
दोघेही कॉफी पित पित गप्पा मारत होते....की अचानक....
"छुन...छुन...."
पुन्हा तोच पैजनीचा आवाज....
त्याने मान वर करून आजुबाजुला पाहिले....
समोरून बेबी पिंक कलरच ड्रेस घातलेली....चेहरा नेहमीसारखा दुपट्ट्याने झाकून घेतलेला.....डोळ्यात प्रचंड भीती....तरीही चेहऱ्यावर एक आकर्षकता...काय माहित.....वेद तिला पाहत होता...ती त्याच्या समोरून कॉफी शोपमधुन बाहेर गेली.
वेद तिलाच वळून वळून पाहत होता....ती बाहेर तसा तो तिच्या मागेमागे गेला पण ती कुठे गेली....त्याला ती कुठेच दिसेना....??
"गार्गी...तू कॉल कर मी कार घेऊन येते....ठीक आहे...."समीरा
"ह्म्मन...."गार्गी
समीरा पार्किंग लॉट मध्ये गेली....
गार्गी टेलिफोन बूथ मध्ये गेली आणि तिने कॉल केला...दुसऱ्याच रिंग मध्ये कॉल उचलला....
"हॅलो...." गार्गी
"हॅलो....कोण...?"
"बाबा.....मी..." गार्गी
"गार्गी बेटा...तू.....अग कुठे आहेस ?...कशी आहेस ?...बेटा....तुला काही झालं नाही ना ?....तू सुटलीस कशी?....गार्गी बेटा...बोल बाळ ..बोल...." बाबा
"? बाबा मी ठीक आहे...आई कशी आहे ?....तुम्ही कसे आहात?..."गार्गी बोलता बोलता रडू लागली...काही क्षण कोणीच काही बोलेना...
"तुझी आई ठीक आहे...घे बोल तिच्याशी ..."बाबा
"गार्गी... बाळा कशी आहेस....तू ठीक आहेस ना ..."आई
"आई ...मी ठीक आहे...नको काळजी करुस....तुम्ही ठीक आहात ना...त्या लोकांनी तुम्हाला काही त्रास तर नाही दिला ना..."गार्गी
"सध्या तरी काही त्रास नाही दिला....पण त्यांची माणसं पाळती वर आहेत...तू फोन ठेव बेटा....त्यांना माहीत पडल तर ते तुला सोडणार नाहीत...."आई
"हो.बेटा...तू फोन ठेव...गार्गी....गार्गी..."बाबा
पण गार्गी तिथे नव्हतीच....फोन तर खाली पडून लोंबकळत होता...
आईशी बोलताना तिचा लक्ष समोर गेला...समोर काही माणस तिच्याच दिशेने येत होते....गार्गी ने फोन तिथेच टाकला आणि ती पळू लागली....ती तिथून पळाली खरी पण ते लोग आता तिचा पाठलाग करत होते...गार्गी पळत पळत रस्त्याच्या जवळ आली......
भरधाव वेगाने गाड्या रस्त्यावरून जात होत्या...ती रस्त्याच्या कडेने पळू लागली...पण तिला रस्ता पार करायचा होता....तिने मागे वळून पाहिले...ते लोग तिच्या फार दूर नव्हते.... ती रस्ता क्रॉस करण्यासाठी वळली.....आणि अचानक.....तिच्या समोर एक ब्लॅक कार येऊन थांबली....ती घाबरून दोन पावलं मागे गेली....तेवढ्यात कारचा दरवाजा उघडला....
"लवकर बसा....ते लोग यायच्या आधी... कम ऑन...."
गार्गी त्याच्याकडे आश्चर्य चकित होऊन पाहत होती....त्याने तिच्या मागे पाहिलं...आणि पटकन बसल्या जागेवरून त्याने वाकून तिचा हात पकडला आणि ओढून तिला गाडीत बसवले ...ती अजुनही शॉक मध्येच होती.
त्याने कार चालू केली...आणि स्पीड वाढवली....
गार्गी ने खिडकीतून मागे वळून पाहिले....ते लोग अजूनही त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते...पण थोड्या वेळाने त्यांनी पाठलाग करणं सोडून दिला.
गार्गी आता त्याच्याकडेच पाहत होती....ब्लॅक शर्ट...ब्लॅक जीन्स....एका हातात वॉच....एका हातात.... चांदीचे ब्रेसलेट....त्याच्या चेहऱ्यावर उडणारे त्याचे केस आणि त्याची ती बिअर्ड.....त्यात ती एक क्युटशी स्माइल.
"आय हाय....हा किती क्यूट आहे....??" गार्गी तर त्याच्यावर एकदम फ्लॅट झाली...त्यात त्याने लावलेला परफ्यूम पूर्ण कारमध्ये दरवळत होता....आणि मंद आवाजात चालू असणारी गाणी....
"सावल्या फुलांच्या?....पावलेही फुलांची?....
वाट हळवी वेचताना?.....सावर रे ये मना....?
सावर रे ...सावर रे....??
सावर रे एकदा सावर रे...??
सावळ्या क्षणांचे.?..भरून आल्या घणांचे...?️
थेंब ओले झेलताना?️?️...सावर रे ये मना....
सावर रे...सावर रे....?
सावर रे एकदा....?
सावर रे..ये.......?
भान उरले ना जगाचे .?.....ना स्वतः चे...?
सोहळे हे जाणिवांचे??.... रेणिवांचे....?
दूर झाले रात दीन तू ♥️...सावर रे...ये मना सावर रे..
सावर रे एकदा...सावर रे......"??
गार्गी त्याच्याकडे भान हरपून बघत होती ?......तो ड्रायव्हिंग करत होता....पण ती त्याला बघत आहे हे पाहून तो गालातल्या गालात हसत होता....☺️
अचानक समोरच्या गाडीने वाजवलेल्या हॉर्न मुळे ती भानावर आली?.....तिला काही समजत नव्हते.... ?
"कोण तुम्ही......आणि..."गार्गी?
"Hi..... मी वेद....वेद नाईक...."वेद?
"तुम्ही कोणीही असो....आधी गाडी थांबवा...."तिने जरा रागातच त्याला सांगितले.....?
" मला वाटतं तू मला thanks म्हणायला हवस?.....कारण मी तुला त्या गुंडापासून वाचवले.....?" वेद
"हे बघा मी तुम्हाला नाही ओळखत.....आणि मी अनोळखी माणसाशी बोलत नाही.....?आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा नाहीतर......"गार्गी
"नाहीतर..... अह्म्म...नाहीतर काय??" वेद
गार्गी ने गाडीत सगळीकडे भिरभिरती नजर फिरवली....आणि झटक्यात तिने सीटच्या वर असणारे डोक ठेवण्याचं ओढून काढलं आणि त्याची टोकदार दोन्ही सळ्या त्याच्यावर रोखल्या.....?
"हे पाहिलत ना......?" गार्गी
"O hello...... ही माझी favorate कार आहे.....आणि तुम्ही अस माझ्या कारला damage करू शकत नाही ...??"अस म्हणत त्याने गाडी थांबवली.....
गार्गी ने पटकन कार चा दरवाजा उघडला आणि बाहेर पडली तिने पुन्हा आपला चेहरा दुपट्याने झाकला आणि ती धावत रस्त्याच्या पलीकडे गेली.
वेद हसतच तिच्याकडे पाहत होता☺️.....काय मुलगी आहे?.....अस म्हणत त्याने दरवाजा बंद केला.....अचानक त्याचं लक्ष खाली गेलं....तिची पैंजण तिथेच पडली होती.....त्याने ती उचलली आणि आपल्या खिशात ठेऊन दिली.
त्याने पुन्हा बाहेर पाहिलं....पण ती कुठेच नव्हती....त्याने गाडी स्टार्ट केली आणि निघून गेला.
गार्गी रस्त्याच्या पलीकडे आली.....तिने आजुबाजुला पाहिले ...आणि ती फूटपाथ वरून चालू लागली.....अचानक तिला हाक ऐकु आली....आवाज ओळखीचा वाटला म्हणून तिने मागे वळून पाहिले?.....समीरा तिची कार घेऊन आली होती....तिला पाहून तिने कार थांबवली आणि धावत जाऊन गार्गी ला मिठी मारली.?
"कुठे गेलेलिस....मी किती घाबरले माहित आहे?......तुला काही झालं तर नाही ना....."तिने गार्गी ला पाठून पुढून तपासून पाहिलं....?
"तुम्ही नंतर बोलाल का.. ?आपल्याला निघायला हवं....??" गाडीतून एक आवाज आला.....तस गार्गी ने समीराच्या मागे पाहिले....तिच्या गाडीत एक माणूस बसलेला होता ...
तिने सामी कडे प्रश्र्नाकित मुद्रेने पाहिले...??
"तू तिथे कुठेच नव्हतीस....मी फार घाबरले?....आणि राघव सरांना कॉल केला...त्यांनी याला पाठवलंय आपल्या मदतीला.....तुला नंतर सांगते.....चल आपण गाडीत बसू...."म्हणत समिराने तिला गाडीत बसवले....आणि तिघेही पुन्हा समीराच्या पार्लर मध्ये यायला निघाले....
क्रमशः.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा