Login

❤️अजब प्रेमाची ❤️ गजब गोष्ट ❤️...७

Ham Tum Ek Sath...





समी पार्लर मध्ये आली. आज तिच्याबरोबर एक मुलगा होता. तिने त्याला आत बोलावलं. सर्वांनी एकदा समी ला पाहिले. तिला good morning ? विश केलं आणि पुन्हा आपल्या कामाला लागले.


समी आपलं काम करायला गेली. तिच्याबरोबर असणारा तो मुलगा मात्र जरा uncomfortable झाला होता.




" सर...तुम्हाला काही हवयं का...? " रीकू.



" न.." (त्याने थोडा घसा खाकरला आणि जरा मोठ्या करडी आवाजात) " नाही...काही नको." म्हणाला.


त्याला बघून रिकुला जरा विचित्र वाटल. ती चारू कडे आली..."अग ये चारू. तो मुलगा पाहिलास....?" रीकु



"Oy... मी इथे मुलं पाहायला नाही येत. समजलं... ? " असं म्हणत ती पुन्हा आपलं काम करू लागली.



" तस नव्हे ग...पण तो जरा विचित्र वाटतो मला " रिकू




समी या दोघांच्या गोष्टी ऐकुन गालातल्या गालात हसते. आणि घसा साफ करत बोलते...." तुमचं गप्पा करून झालं असेल तर थोड काम पण करा. मी जरा बाहेर जाऊन येते. मिस. वैशाली येतील त्यांना अटेंड करा. नाहीतर रहाल गोष्टी करत...?"


समी थोडासा आवाज वाढवून सांगते आणि ती व तो बाहेर निघून जातात.




दोघेही कॉफी शॉप मध्ये येतात. समी आणि तो मुलगा एका टेबल जवळ जातात. समी पहाते तर एक मुलगी त्या मुलाला पाहत असते. समी (मुद्दाम) अचानक पडते. तिला सावरण्यासाठी तो मुलगा पटकन तिला पकडतो आणि आपल्या जवळ ओढतो.


"Ooo.... थँक्यु डिअर.?..." असं म्हणत समी त्याला मिठी मारते आणि गालावर ओठ टेकवते.




"?...." तो मुलगा आपला गाल पुसत रागात तिच्याकडे पाहतो. दोघेही तिथेच बसतात. समी त्याला पाहून हसत असते. तेवढ्यात समोरून रॉकी येताना दिसतो. ती त्याला हात वर करून बोलावते. तसा रॉकी तिथे येऊन बसतो.




" काय कसं चाललंय प्रशिक्षण...? गाडी कुठपर्यंत येऊन पोहोचली आहे...??" रॉकी एक भुवई वर करत त्या मुलाला पाहत विचारतो.




एव्हाना तो मुलगा पार रडकुंडीला आला होता. त्याने एकदा रॉकी आणि एकदा समी कडे पाहिले...??




" काय भाई, मला हे नाही जमणार....???" तो मुलगा.




"Shuuuu....अशी काय करतेस गार्गी....? अग अशी मुलीसारखी रडायला लागली आणि बोलायला लागलीस तर सगळे तुला ओळखतील...?" रॉकी




"भाई....तुला कळत नाहीय मी काय सांगतेय ते. अरे मला कसतरी वाटतंय. या मुलांच्या ड्रेस मध्ये....एकदम ईयू... ??? असं..." गार्गी विचित्र तोंड करत रॉकी कडे पाहते.




तिला पाहून रॉकी आणि समी हसायला सुरुवात करतात. तशी गार्गी अजूनच निराश होते?. ते पाहून रॉकी समीला डोळ्यांनीच नको हसू असा इशारा करतो.


" गार्गी आधी तू शांत हो. हे बघ तुला कोणीही ओळखू शकत नाही. तू ना दिट्टो मुलगा वाटतेस. सो डोन्ट वरी...थोडंसं जड होईल पण नंतर सवय होईल."




"अरे...पण हीची... सॉरी सॉरी...याची ?राहण्याची व्यवस्था कुठे...? ?" सामी




" माझा एक मित्र आहे. तो हॉस्टेल वर राहतो. बॉइझ हॉस्टेल...त्याच्या रूम मध्ये तो एकटाच असतो. त्याच्याबरोबर राहिलं ही..." रॉकी




"काय....??? एका मुलासोबत....?? आणि तेही बॉइज् हॉस्टेल मध्ये....?? नाही मी नाहि...!! " गार्गी निर्धाराने त्याला नकार देते. पण जो ऐकेल तो रॉकी कसा....??




" हे बघ छोटी, मला माहित आहे तुला नाही आवडणार पण तो वर्मा....त्याला मी चांगल्या पैकी ओळखतो. तो तुला शोधण्यासाठी पूर्ण मुंबई पिंजून काढेल. पण मला नाही वाटत की तो एका मुलीला शोधायला बॉइज हॉस्टेल मध्ये येईल...! ?. ती तुझ्यासाठी एक सेफ जागा आहे. समजलं...? " अस म्हणत रॉकी ने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तसा तिच्या डोक्याचा विग थोडासा पुढें तीच्या चेहऱ्यावर आला.




"अरे...इतना अंधेरा कयसे होगाय भाई....?? ?" गार्गी च्या बोलण्यावर समी आणि रॉकी मनापासून हसले.


समीने पुढे होत तिचा विग सरळ केला. " अरे यार.... हिच्या केसंचाच प्रॉब्लेम होतोय. लांब केस त्यामुळे विग राहतच नाही डोक्यावर..." समी




" माझ्या कडे एक आयडिया आहे. पण आता नको. संध्याकाळी मी आणि गार्गी माझ्या मित्राला भेटायला जाणार आहोत. आता तुम्ही शॉपिंग करा. मी ठीक पाच वाजता गार्गी ला घ्यायला येईन. तोपर्यंत सगळी पॅकिंग करा ठीक आहे ना...??" रॉकी



" हो..चालेल..." समी




रॉकी तिथून आपल्या कामासाठी निघून जातो. समी आणि गार्गी दोघीही थोडीफार शॉपिंग करतात. आणि पार्लर मध्ये निघून येतात.



संध्याकाळी ठीक पाच वाजता गार्गी आणि समी पार्लर बाहेर रॉकी ची वाट पाहत असतात. रॉकी त्यांच्या समोर गाडी थांबवतो. समिंने गार्गी च्य बॅग्स डिकीत घातल्या. रॉकी ने गार्गी ला पाहिले. तिचा चेहरा उतरला होता. ती नर्व्हस झाली होती.. ??




" छोटी, माझ्यावर विश्वास ठेव. तू तिथे एकदम सुरक्षित आहेस. आणि राहिली गोष्ट माझ्या मित्राची. तर तो सकाळी त्याच्या कामाला गेला की तो डायरेक्ट रात्री येतो. त्याचाही टाईम नाही. म्हणजे तू दिवसभर एकटीच...! काय...ठीक आहे ना...? नको टेन्शन घेऊस." असं म्हणत त्याने पुन्हा तिच्या डोक्यावर हात फिरवायला जातो. " उफ सॉरी.... याचा विचार केलाय मी... चल." रॉकी गाडीत जाऊन बसला. गार्गी ने समीला पाहिले. तिचे डोळे भरले होते. दोघींनी एकमेकींना मिठी मारली.




"ओ मॅडम अस भर रस्त्यात एका मुलाला मिठी मारायला लाज नाही वाटत....?" रॉकी त्यांची खोडी काढत म्हणाला.




" गप रे रोक्या....?." समी ने रॉकी ला पाहत डोळे वटारले. व पुन्हा गार्गी ला पाहिलं. " गार्गी खूप छान वाटलं. तूझ्याशी भेटून. सांभाळून रहा. आणि हो या वेशात कुणा मुलीला प्रेमात वैगेरे पडू नकोस म्हणजे मिळवलं...? " सामी वातावरण हलकं करत बोलली.




गार्गी गाडीत बसली. रॉकी ने गाडी स्टार्ट केली. गार्गी ने मागे वळून पुन्हा एकदा समीला पाहिले आणि हाताने बाय केले.




गाडीत सगळी शांतता होती. रोकिने गार्गी ला पाहिले आणि गाडी एका साइडला उभी केली. त्याने  मागच्या सीटवरून एक बॉक्स घेतला नी गार्गी ला दिला...



" हमम्म...हा घे मोबाईल. यात माझा, राघव सरांचा, समीचा नं. सेव केलाय. पण या फोनवरून फक्त तू कॉल करू शकतेस. तुला कोणीही कॉल नाही करणार. आणि हो....हा नंबर ट्रेस ही करता येणार नाही..." असं म्हणत रॉकी ने बॉक्स तिच्या हाती दिला आणि तिच्या डोक्यावरील विग बाजूला काढला.




"अरे विग का काढलास....???"गार्गी ने संभ्रमित होऊन विचारलं.



त्याने एक मोठ्ठा लांब कापड आणल होतं त्याने गार्गी च्या डोक्यावर पगडी बांधली जेणेकरून तिचे केस पूर्णपणे लपविले जावेत.... " हा .... आता ठीक आहे." रॉकी ने गाडी सुरू केली. मधेमधे तो गार्गी ला सूचना देत होता. गार्गी त्याला होकार देत होती. थोड्याच वेळात गाडी एका छोट्याश्या नर्सरी जवळ थांबली.




" तू इथेच थांब. मी आलोच...." रॉकी त्या नर्सरीमध्ये गेला.




गार्गी गाडीच्या बाहेर आली तिने आजुबाजुला पाहिले. फार छोटी नर्सरी होती ती. ती थोड पुढे गेली. तिथे लहान मोठी भरपूर रंगीबेरंगी फुलझाडे होती. त्या फुलांचा सुगंध दरवळत होता. ती त्या झाडांवरून प्रेमाने हात फिरवू लागली. तेवढ्यात तिला बट मोगऱ्याच झाड दिसल. पांढरी शुभ्र, टपोरी मोगरा फुलला होता. ती धावत त्या झाडाकडे गेली. तिने डोळे बंद करून त्या फुलांचा वास आपल्या मनात भरत होती. ती त्या फुलांना हात लावणार तोच ...




" माझ्या परवानगी शिवाय माझ्या झाडांना हात लावलेलं मला अजिबात आवडत नाही. दूर व्हा आधी त्या झाडांपासून.....????"




गार्गी ने दचकून मागे पाहिले. ती शॉक होऊन त्याच्याकडे पाहताच राहिली....




"अरे...हा तर तोच आहे. काय नाव बरं याचं......??" गार्गी गालावर हात ठेवून आठवण्याचा प्रयत्न करू लागली. तिला तसं पाहून तो अजूनच चावतळला. तो रागाने पुढे आला. आणि काही बोलणार .....





" वेद....तू इथे आहेस....? मी तुला सगळीकडे शोधलं...." रॉकी लगबगीने त्या दोघांच्या मध्ये येऊन उभा राहिला.



गार्गी रॉकी च्या आडून वेद ला पाहत होती. वेद ने लांब हातच ब्लॅक टी शर्ट घातला होता. आणि ब्लॅक जीन्स घातली होती. त्याने त्याच्या केसांचा एक छोटासा अंबाडा टाईप केला होता. तरीही त्याचे केस त्याच्या चेहऱ्यावर येत होते. त्याने एका हाताने त्याच्या चेहऱ्यावर येणारे केस मागे केले. गार्गी त्यालाच पाहत होती.



" उडे जब जब जुल्फे तेरी...हो


उडे जब जब जूल्फे तेरी


कवरियोंका दिल मचले...


कवरीयोंका दिलं मचले....


जिंदमेरिये....❤️❤️ "




तीच हृदय dj लावल्यागत धडधडत होतं ❤️. तिने आजुबाजुला पाहिले.


" च्यायला....मलाच गाणं ऐकु येतंय की सगळ्यांनाच..?आणि या हृदयाला काय झालं...? " असं म्हणत तिने एक हात हृदयावर ❤️ ठेवला आणि एका हाताने कान साफ करून पुन्हा गाणं ऐकु लागली.




वेद तिलाच पाहत होता. हे पाहून तिने पटकन जीभ बाहेर काढली आणि रॉकी च्या मागे लपली.




" हा कोण आहे....? ए तू बाहेर ये आधी. कोण तू काय हवय...? ? " वेद




" वेद...अरे ती? तो... माझ्याबरोबर आलाय. मी तुला सांगितलं होतं ना...तोच हा. " रॉकी ने त्याला आठवण करून दिली...






वेद ने डोळे मोठे केले. त्याने एकदा गार्गी ला पाहिलं आणि रॉकी चा हात धरून त्याने त्याला एका बाजूला आणला.




" रॉकी...तू ठीक आहेस ना...?? अरे हे काय आहे हे...?? I mean.. हा हा नाही वाटत यार. मला वाटतं तुझ्याकडून. .. sorry sorry... त्या देवाकडून काहीतरी गडबड झालीय. त्याची मिस्टेक तू माझ्याकडे कशी काय आनु शकतोस ..?" वेद थोडासा चिडत म्हणाला.




" वेद.....plz. त्याच्याबद्दल अस काही बोलू नकोस. मला अजिबात आवडणार नाही." रॉकी




" Sorry रॉकी. पण हा जो कोणी आहे. माझ्यासोबत नाही राहू शकत. त्याच्यासाठी दुसरी जागा शोध..." वेद ने ठामपणे सांगितले.




" बरोबर रे.. आज मला गरज आहे म्हणून तू शो ऑफ करून दाखवत आहेस. पण जर तुला नाहीच म्हणायचं होतं तर मला अगोदरच संगायचास ना. आता त्याच्यासमोर माझा केवढा मोठा पचका होईल. मी तर त्याला तुझ्या माझ्या मैत्री बद्दल काय काय सांगितले...?? पण तू तर.....? मला वाटलं नव्हतं तू असा वागशील. काही हरकत नाही मी जातो..." रॉकी ने आपला एक हात आपल्या चेहऱ्यावर नेला आणि तो अश्रू ( न आलेले?) पूसू लागला..." चल मी येतो..." असं म्हणत रॉकी तिथून निघू लागला...


" ठीक आहे...बाय..." वेद




रॉकी थोडा पुढे गेला. आणि त्याने चोरून वेद ला पाहिले. पण वेद ने त्याला पाहून हात हलवला.




" दोस्त दोस्त ना रहा... ? प्यार...प्यार ना रहा

....? " आणि तो पुन्हा गार्गी च्या दिशेने चालू लागला.



" नौटंकी साला....एक नंबर नौटंकी...." मनात दोन शिव्या देत वेद ने रॉकी ला हाक मारली.



रॉकी त्याचीच वाट पाहत होता. जसा वेद ने हाक मारली. तसाच रॉकी त्याच्या समोर एखाद्या (अती) विनम्र भावात उभा राहिला.



" तुझे इमोशनल अत्याचार करू झाले असतील तर मी काही बोलू...?? " वेद एक भुवई वर करत म्हणाला.?



" हा...बोल ना..." रॉकी



" हा माझ्याबरोबर राहू शकतो.....पण...." वेद ने एक पॉज घेतला...


" पण काय.....?? ?"रॉकी अधीर होत म्हणाला.


" पण ....माझ्या तीन अटी आहेत." वेद गार्गी ला पाहत म्हणाला.


"मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत..." रॉकी उतावीळ होऊन म्हणाला.


"आधी ऐकुन तर घे....कोणत्या अटी त्या....?" वेद ने भुवई उंचावून म्हणाला.



" हा बर बोल..." रॉकी ने स्वतःला नॉर्मल करत होकारार्थी मान हलवली.




" पहिली अट... हा जो कोणी आहे. माझ्यापासून सुरक्षित अंतर राखून राहिला पाहिजे. म्हणजे अगदी चार हात लांब...!


दुसरं म्हणजे....त्याने माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये नाक तोंड हात...असे कोणतेच अवयव खुपसू नये...!


आणि तिसरी अट.... की हा माझ्याबरोबर कुठेही बाहेर फिरायला किंवा माझ्या कामावर सुध्दा आला नाही पाहिजे. आणि जर एकदम महत्वाचं कारण असेल तर येणं ओके आहे. पण त्याने माझ्या पासून दूर राहावं आणि कुठेही ओळख सांगताना मला मध्ये ओढू नये.. आणि हो...मी सांगेन तसा वागला पाहिजे. का...? कशासाठी...? कधी...? असे वायफळ प्रश्न विचारू नयेत...?" वेद




"मला तरी तीनही अटी मान्य आहेत..." रॉकी




" तू माझ्यासोबत राहणार नाहीस. तो राहणार आहे...सो त्याला विचार..." वेद मनात " आता बघतो ना हा कसा तयार होतो माझ्याबरोबर राहायला...?"




रॉकी गार्गी च्या जवळ आला...


"छोटी... मला वाटतं याच्या अटी तुझ्यासाठी फारच महत्वाच्या आहेत...यात तुझाच फायदा होईल..."


" हिला....?..ह्याला तुझ्या अटी मान्य आहेत." रॉकी



"? वेद.... साला. मला तर वाटलं होतं अटी ऐकुन हा नाही म्हणेल. पण काही हरकत नाही. याला मी असा धडा शिकवनार की दोन दिवसात यान बोर्या बिस्तरा हलवला पाहिजे.....??"




वेद ....रॉकी ...आणि गार्गी गाडीत बसले. रॉकी ड्रायव्हिंग करत होता तर वेद त्याच्या बाजूला बसला होता. गार्गी मागच्या सिट वर बसली होती.




" याला काही नाव गाव...???" वेद



" याचं नाव.... गार....गौरव...गौरव सिंग कपूर..." रॉकी ने गार्गी ला समोरच्या आरशातून पाहिले. आणि नाव ओके ना ?इशारा केला... तसं गार्गी ने ही ओके चा ? इशारा केला.



" हमम्म...गौरव..." वेद



"आता बघाच तू गौऱ्या. तुला दोन दिवसात माझ्या रूम मधून पळवून नाय लावला तर नाव वेद नाही सांगणार...???" वेद मनात ठरवून स्मित हास्य करतो.



" वेद...मला माहित आहे. तुला तुझ्या एकटे पणात कोणीही नकोय. पण असा किती दिवस एकटा राहशील....? असा किती दिवस स्वतः ला त्रास करून घेशील...? तुला यातून बाहेर काढण्यासाठी मी गार्गी ला तुझ्याबरोबर ठेवलंय. मला खात्री आहे. तू नक्की पूर्वी सारखा वेद होशील. तुला व्हावच लागेल. आणि तुला गार्गी ही मदत करेल...?" रॉकी वेद कडे पाहत मनात विचार करत म्हणाला.




" त्यादिवशी हा किती छान बोलला माझ्याशी. मी त्याच्याशी रागात बोलले. मारण्याची धमकी दिली. तरीही हा मला काहीच बोलला नाही. उलट माझ्याकडे बघून हसत होता आणि आज...? आज किती रागात...? एकदम अँग्री यंग मॅन....तरीही त्यादिवशी सारखाच क्यूट...? हे भगवान...! मी याच्याबद्दल एवढं का विचार करतेय...." गार्गी ने एक दीर्घ श्वास घेतला. आणि हातातला मोगरा हळूच नाकाजवळ घेऊन त्याचा वास घेत बाहेर पाहू लागली.


गाडीत एकदम शांतता होती. वेद ने गाणी चालू केली आणि समोरच्या आरशा तून तो गौरवला (गार्गी ) ला पाहू लागला. गौरव( गार्गी) बाहेर पाहत होती. वेद त्याच्या कडेच पाहत होता.  की त्याचं लक्ष त्याच्या डोळ्यांवर गेलं. \" हे डोळे...! मी कुठेतरी पाहिले आहेत. पण कुठे....? कुठे.....? ह्याला मी कधी भेटलो आहे का...? " वेद डोक्यावर हात फिरवत आठवण्याचा प्रयत्न करू लागला.


क्रमशः....



( नमस्कार...वाचकहो...आता आपली स्टोरी...महत्वाच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे...वेद गार्गी ला...म्हणजेच गौरव ला आपल्या रूम मधून बाहेर पळवेल का...की गार्गी...म्हणजेच गौरव त्याला नको पुरे करून सोडणार आहे...त्यासाठी पुढचं पार्ट लवकर पोस्ट करेन...तोपर्यंत हा पार्ट कसा वाटलं हे मला नक्की कळवा... जर तुमचं गार्गी आणि गौरव यात कन्फ्युजन होत असेल तर मला नक्की सांगा. तुमच्या समीक्षा माझ्यासाठी उत्साहवर्धक आहेत...त्यामुळे मला लिहायला उत्साह येतो. धन्यवाद...??")



0

🎭 Series Post

View all