Login

❤️अजब प्रेमाची ❤️ गजब गोष्ट ❤️४

Found in a mess...

रिक्षा एक डबल माळी बंगल्या समोर थांबली. 

गर्गीने हळूच बाहेर पाहिले ...आज त्या बंगल्यासमोर भरपूर गाड्या थांबल्या होत्या...तिला काही कळेना...


" ओ ताई ... उतरताय ना..." रिक्षावाला


ती खाली उतरणार इतक्यात तिला काही माणस दिसली...

" अरे हे लोग इथे..." ती पटकन आता बसली.

तिला काय करावं ते सुचेना.



" भाऊ...मल जरा कॉल करायचं होतं...मला तुमचा फोन देत का...जास्त नाही बोलणार...plz..."?



त्या रिक्षावाल्याने गार्गी ल एकदा पाहिलं त्याने आपला फोन तिच्या कडे दिला. 

गार्गीने नंबर डायल केला आणि फोन कानाला लावला...रिंग वाजत होती...आणि कॉल उचलला.


"हॅलो....मी पोहोचलीय...पण..."


तीच वाक्य पूर्ण व्हायच्या आत समोरील व्यक्ती जवळ जवळ ओरडलीच....


"तुम्हाला किती वेळ सांगू मला कोणतीही पॉलिसी नको म्हणून ..याद राखा पुन्हा कर मला कॉल केला तर???...पोलिसांच्या हाती देइन ....ठेवा फोन...?"

गार्गी अक्षरशः दचकलीच?. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले?...तिला तिच्या कानावर विश्वास बसेना....तिच्या मामला तिने इतक्या रागात कधीच पाहिलं नव्हतं. 

रिक्षावाला तिच्या कडे पाहू लागला.....


"काय पण या मुली...कोणाच्या हि प्रेमात पडतात...काही क्षणांच्या प्रेमासाठी घर सोडून येतात...आणि नंतर त्या प्रेमाने धोका दिला की असं रडत बसतात..." तो मनातच विचार करत होता.


तेवढ्यात बांगल्या समोरच्या माणसाला गार्गीने त्यांच्या कडे येताना पाहिले. ती घाबरली तिने रिक्षा चालू करायला सांगितली...?



"अहो पण कुठं जायचयं ते तरी सांगा..." रिक्षावाल्याने प्रश्न केला....



" तुम्ही रिक्ष चालू करा....लवकर ....?मी सांगते कुठे जायचयं ते....." ती मोठ्याने बोलली तसा रिक्षावाल्याने रिक्षा चालू केली. 



रिक्षा त्या बंगल्यापासून फार दूर आली होती...गार्गी अजून शांत होती?. तिला कुठं जावं...कुणाकडे जावं काही माहित नव्हतं. त्या शहरात तिला फक्त मामा चा मोठा आधार होता...आणि आता त्यानेही तिच्याकडे पाठ फिरवली होती.


तिने बाहेर पाहिले....एक देऊळ पाहून तिने रिक्षा थांबवायला सांगितली. ती खाली उतरली.

" च्यायला...येवढ्या लांब रीक्ष पळवली पण मला नाही वाटत काही ? हातात मिळेल..." त्याने तिच्या कडे पाहिले.



"किती झाले...." गार्गीने त्याला रिक्षेचे पैसे विचारले.


"३००/-..." रिक्षावाला


गार्गी ने थोडा विचार केला आणि तिने आपल्या एका कानातील एक छोटीशी रिंग काढली आणि त्याच्या हातावर ठेवली..


" काका...माझ्या कडे सध्या पैसे नाहीत पण या रिंगचे दोन तीनशे रुपये नक्कीच येतील...." अस म्हणत गार्गी देवळात निघून गेली.


तिने देवाला नमस्कार केला. आणि बाजूच्या खांबाला टेकून बसली. तिला जाम भूक लागली होती...तहानही लागली होती पण खूप रात्र झाली होती... त्यामुळे देवळात कुणीही नव्हतं....तिने आजुबाजुला पाहिले. मंदिरच्या आवारात एका बाजूला नळ होता...तिने त्या नळाकडे पाहिले....निदान पाणी तरी पिऊया...म्हणून ती नळाकडे गेली. तिने हातपाय धुतले...जिथे थोडीफार खरचटलं होत तिथेही पाणी लावून जखम साफ केली आणि पोटभर पाणी पिऊन पुन्हा मागे देवळात गेली. पाणी पिल्यामुळे तिला बर वाटत होत...आता पुढे काय...???



ती चालत होती की अचानक तिला कोणाचा तरी आवाज आला तिने मागे वळून पाहिले ...तो काय....??

.

.

"तुम्ही...इथे...." गार्गी?


समोर रिक्षेवल्याला पाहून गार्गी घाबरली तिच्या मनात वाईट वाईट विचार येऊ लागले ....


" घाबरु नका ताई...तुम्ही ज्या नंबरवर फोन केला होता...त्या नंबर ने पुन्हा मला कॉल आला त्यांनी मला तुम्हाला एका पत्त्यावर घेऊन जायला सांगितले. ?

गार्गी ने त्याच्या कडे पाहिले....


रीक्षेवल्याला तिच्या डोळ्यात संशय स्पष्ट दिसत होता. त्याने लगेच कॉल केला आणि तिच्या जवळ दिला. तिने फोन घेतला आणि कानाला लावला.


"काळजी नको करुस...तो रिक्षेवाला जेथे घेऊन जात आहे तिथे जा...आणि माझं नाव सांग...समजलं." कॉल कट झाला. तिने नंबर पाहिलं...आणि त्या रिक्षेवल्याबरोबर त्याच्या रीक्षेत बसली. बरोबर पाऊण तासांनी रिक्षा एका ब्युटी पार्लर समोर थांबली.



"हमम्म...हा तुमचा स्टॉप. "त्याने गार्गीला उतरायला सांगितले ...


"ताई...ही घ्या तुमची रिंग..." असं म्हणत त्याने तिच्या हातावर तिची रिंग ठेवली...आणि तो निघून गेला.


गर्गिने समोर पाहिले..." ब्युटी पार्लर...मला इथे का पाठवले मामाने..." ?गार्गी ला प्रश्न पडला.


तिने पार्लर मध्ये एंट्री केली...तिथे कुणीही नव्हतं...ती मागे फिरणार एवढ्यात लाइट्स लागल्या आणि तिच्या समोर एक शॉर्ट  पँट सीवलेस शर्ट घातलेली....गौर वर्णाची मुलगी उभी होती. तिने केसांचा बो घातला होता...काही केस कलर केले होते...कानाच्या पाळ्या मध्ये रांगेत रिंगा घातल्या होत्या...तिला पाहून गार्गी ला कुण्या मोडलची आठवण झाली...


" गार्गी...ना तू?"तिने प्रश्न केला.


"हमम्म"


तिने गार्गी ला आता घेतले ..आणि दरवाजा बंद केला.


"कोणी पाठलाग तर नाही ना करत....?"तिने गार्गी ला विचारले....गार्गी ने मानेनेच नाही म्हटले..?


"बरं...चल माझ्याबरोबर....तिने पुन्हा लाइट्स ऑफ केले आणि तिने तिला त्या पार्लर मध्ये असणाऱ्या छोट्याश्या खोलीत नेले. 


तिने त्या खोलीतील लाइट्स लावल्या आणि गार्गी ला बसायला खुर्ची दिली.


" हाय....मी समीरा..." तिने गार्गी समोर शेक हॅण्ड करण्यासाठी हात पुढे केला....गार्गी नेहीं कसनुसा हसत तिच्या हातात हात मिळवला.??


"मला वाटतं तुला फ्रेश व्हायला हवं...एक काम कर तिथे बाथरुम आहे...जा फ्रेश होऊन ये...तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते..."समीरा

गार्गी ने तिने सांगितलेल्या दिशेने पाहिलं... व ती फ्रेश व्हायला गेली.


गार्गी जेव्हा बाहेर आली तेव्हा समीरा एका हातात कपडे तर दुसऱ्या हातात चहाचा ट्रे घेऊन ☕???उभी होती. तिला पाहताच समीराने एक स्मितहास्य ?केले.


"हे घे तुझे कपडे फार मळलेत आणि फाटले देखील आहेत...तू हा ड्रेस घाल..." समीरने गार्गी का ड्रेस दिला. गार्गी ने तिने दिलेला ड्रेस घातला....


समिराने चहाचा ट्रे गार्गी समोर केला तसे गार्गी ने एखाद्या  अधाशासरखे बिस्कीट खाऊ लागली. समीरा नेहि तिला डिस्टर्ब नाही केलं...


ऑफ कोर्स...ती केव्हापासून त्या गुंडांपासून पळत होती ...तिला जाम भूक लागली होती. तिने काही वेळातच बिस्कीट आणि चहा संपवला. आता कुठे तिला थोड बरं वाटलं.☺️


" Opsss...सॉरी तुल हवं की नाही तेही विचारलं नाही......सॉरी...?" गार्गी ने तोंड बारीक करत म्हटलं.


"No no...it\"s okk dear...? ते तुझ्यासाठीच होते...तुला अजुन हवं असेल तर तू सांगू शकतेस...." समिरा 


गार्गी ने मानेने नको म्हणून सांगितले.?


" बरं...मी जाते घरी.... खर तर मी थांबणार असते

..पण माझी आई मला फोन करून त्रास देतेय...आणि मी तिला तुझ्याबद्दल नाही सांगू शकत....आणि इथेही नाही राहू शकत....सो आय एम सॉरी....dear....??

आणि हो तुला बाथरुम तर माहीतच आहे...तू इथे आरामात रहू शकतेस...मी सकाळी येईन...घाबरु नकोस...माझ्या स्टाफ मधून कोणीही इथे येत नाही...पण तू मात्र बाहेर जाऊ नकोस......चल बाय...and again sorry...." समीरा तिथून निघून गेली.



गार्गीने एकदा खोली पूर्ण पहिली...तिथे अनेक ड्रेस... makeup च सामान आणि बरच काही होत.


ती एका कोपऱ्यात गेली तिथे तिने पेपर्स घातले आणि तिथेच झोपली....तिला आईबाबंची खूप आठवण येत होती. "काय करत असतील ते ?...त्यांना वाटलं असेल की मी आता या जगात नाही...ते किती रडले असतील...आईने काय अवस्था करून घेतली असेल...?" ?? गार्गीच्यां डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले??. ती हुंदके देऊन रडू लागली....आणि तशीच झोपी गेली.



वेद झोपण्यासाठी आपल्या पलंगावर आडवा झाला. 

पण त्याला काही झोप येईना. त्याने कानात हेडफोन्स घातले आणि डोळे मिटून शांत पडून राहिला. त्याच्या डोळ्यासमोर तीच मुलगी येऊ लागली. जी त्याला हॉटेलच्या बागेत भेटली होती.  वेदला तर तिला सॉरी सुध्दा म्हणता आलं नाही. 


" कोण असेल ती...? आणि ते लोक तिच्या पाठी का लागले असतील...? त्यांनी तिला पकडलं तर नसेल ना ?नाही ...! ?कारण मी त्यांना चुकीच्या मार्गाने जायला सांगितले होते...पण तरीही..." 


त्याने तिचा चेहरा पाहिलं नव्हता....कारण पूर्ण चेहऱ्यावर तिचे केस आले होते. पण तिच्या ओठां खाली असणारा तीळ त्याला स्पष्ट दिसला होता....आणि तिचे डोळे....ज्यात भीती झळकत होती....?


" मी का एवढ विचार करतोय तिचा...?? असेल ती कोणीही...?मला काय त्याचं...? " त्याने तिचा विचार पूर्ण झटकुन दिला...??पण पुन्हा त्याच्या डोक्यात तिचाच विचार येऊ लागला...त्यातच तो झोपी गेला.


क्रमशः



0

🎭 Series Post

View all