All posts in: सामाजिक

स्वप्नांच्या मागे धावताना

Written by

“श्लोक  चल  लवकर,  उशीर  होतोय  मला.” सातव्या  मजल्यावर  राहणाऱ्या  हर्षालीचा आवाज  अख्ख्या  बिल्डिंगमध्ये  घुमला.  सकाळचे  फक्त  सहाच  वाजले  होते  हर्षाली  बारा  वर्षाच्या  श्लोकला  क्रिकेटच्या  कोचिंगसाठी  घेवून  जात  होती.  त्याला  ग्राउंडवर  सोडून  येवून  तिला  नवऱ्यासाठी  डबा,  नाश्ता  बनवायचा  होता.  आठ  वाजता  शमिकाला,  तिच्या  पाच  वर्षाच्या  मुलीला,  शाळेत  सोडायचे  होते.  मग  तिथुन  श्लोकला  आणायचे  आणि  दहा  वाजेपर्यंत  त्याची  तयारी  करून  स्कूलबसमध्ये  बसवून  द्यायचे.  उफ्फ  किती  काम  ते!  सांगता  सांगता  मलाच  थकवा  आला.  ..

1 आठवडा ago
58
0 0