#diwali_special_rangoli

Written by
 • #दिवाळी-स्पेशल-रांगोळी
  रांगोळी हा माझा आवडीचा विषय….
  विविध रंगातून रंगसंगती साधून ,कल्पकतेने रेखाटलेली कला म्हणजे रांगोळी.
  आपल्या भारतीय संस्कृती मध्ये रांगोळीला अनन्यसाधारण महत्व आहे, रांगोळी ही एक कला आहे, आणि वेगवेगळ्या प्रांतानुसार तिचे स्वरूप ही बदलत जाते, कुठे संस्कार भारती, कुठे ठिपक्यांची…..
  कुठलाही सण असो अथवा उत्सव तिथे रांगोळीचा समावेश हा असतोच.
  सकाळी सकाळी शेणाने सरावलेले अंगण आणि त्यावर काढलेली रांगोळी घरात येणार्याचे लक्ष वेधून घेतेच. क्षणभर का होईना तिथे थांबून रांगोळीचे अवलोकन करतोच , आणि सोबत छान कॉम्प्लिमेंट सुद्धा, “वा! छान काढली रांगोळी”😊
  पंगतीत जेवतांना ताटा भोवती तर भाऊबीजेला पाटाभोवती रांगोळीचे महत्व आहेच.
  आज रांगोळीचे स्वरूप थोडे बदलत चाललेय, ठिपक्यांच्या रांगोळीची जागा आता पोट्रेट रांगोळीने घेतलीय, साच्यांच्या रांगोळ्या आलीय, रेडिमेड रांगोळ्या सुद्धा आल्या, फक्त मांडणी करा,आणि ठेवा.

  नवरात्रीची चाहुल लागली की वेध लागतात रांगोळीचे.
  अंगण सुद्धा आता मातीच राहिलेलं नाहीं(खेड्यात मात्र आहे)
  फ्लॅट सिस्टिम मध्ये तर जागाच नाही,….
  अस हे रांगोळी विशेष….
  दिवाळीला कुठली रांगोळी काढावी,म्हणून u ट्यूब वर संशोधन सुरू झालं.
  आणि एकदाची रांगोळी निवडली कुठली काढायची म्हणून….. आवडली तर मला नक्की सांगा हं!
  मी तर एक मोठा प्लायवुड चा तुकडाच कापून ठेवलाय, special रांगोळी साठी…
  त्यावरच रांगोळी काढते, उचलून कुठेही ठेवता येते…माझ्या भाषेत (Movable Rangoli)😂
  दिवाळीच्या पाच दिवसात सकाळी लवकर उठून रांगोळी काढन्यात खूप मजा….
  मी मात्र आवर्जून सणांना रांगोळी काढतेच,
  यानिमीत्ताने का होईना आपल्यातली कला सादर होते.

  (सोबत मी काढलेली रांगोळी)
  आवडल्यास लाईक, कंमेंट करा, आणि मला follow करायला विसरू नका
  शेअर करा मात्र माझ्या नावा- सहित…..😊
  सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🍱🌹🌹🍱🙏

  लता राठी
  अर्जुनी/मोर

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा