Expiry date

Written by

# भाग १

 पूर्वा…पूर्वा…अग ये पूर्वा…देवांश ने ऑफिस मधून येताच , पूर्वाच्या नावाचा जप चालू केला ? …

कारणही तसचं होत..गेल्या महिन्याभरापासून तो सतत पूर्वाला सांगतोय की जुनं झालेलं चप्पल ठेवायचं स्टँड भंगारात विकून तरी दे नाहीतर गरजू व्यक्तीला देऊन तरी दे…पण पूर्वा मात्र त्या स्टँड ची विल्हेवाट लावायलाच तयार नव्हती…

रोज काही ना काही कारणं सांगून ती वेळ मारून न्यायची… त्यातल्या त्यात ते स्टँड अगदी दाराला लागूनच ठेवलेलं..आणि येता जाता कुणाच्या ना कुणाच्या पायाला लागायचं…

पण आज पूर्वाच काही खरं नव्हतं.. ऑफिसच्या टेन्शन मुळे आधीच चीड चीड झालेल्या देवांशच्या पायाला परत एकदा स्टँड लागलं …त्यात भरीस भर रक्त सुद्धा वहायला लागलेल…

त्याचा आवाज ऐकताच पूर्वा हातात पाण्याचा ग्लास घेऊन किचनच्या बाहेर आली..पण त्यांच्या आवाजातला त्रागा तिने बरोबर आधीच हेरला.. आज देवांशच ऑफिस मध्ये बिनसलेल दिसतंय..तो तिच्यावर चिडायचा आत ती रडायला लागली.. तिचं असं नेहमीचं चालायचं..

 चुका करायच्या आणि देवांश रागवायच्या आत रडणं चालू करायचं.. तो आधीच हळवा आणि पूर्वा वर जीवापाड प्रेम! मग तो विरघळायचा ,तिला मिठीत घेऊन समजूत काढायचा..

आताही तसचं झालं…मग तिने त्याच्या पायाला हळद लावून दिली..लागलीच हातात गरम गरम कॉफी सुद्धा दिली.. त्याचं मुड आता बऱ्यापैकी झालं..तोपर्यंत देवांशची आई देवळातून आणि मुलंही खेळून आलेली..

संध्याकाळी छान ,छोले भटुरे आणि सोबतच रेडिमेड श्रीखंडाचा बेत होता.. मुलं अगदी खुश झालीत..पण हे काय? श्रीखंडाची एक्सपायरी गेलेली..पुर्वाचा “बचत ” करण्याचा स्वभाव लक्षात घेता देवांश तिने आणलेल्या वस्तू नेहमीच चेक करून घेत असे ..आताही चेक केलेलं…४ दिवसा आधीच त्याची एक्सपायरी गेलेली..

 तो पूर्वा वर चिडला तेव्हा त्याची आई मध्येच बोलली की ,ते श्रीखंड गार्गीच्या ( मुलगी) वाढदिवसाचं आहे..आणि गार्गीचा वाढदिवस एक महिन्या आधी होऊन गेलेला..म्हणजे त्या आधी ते शॉप मध्ये कितीतरी दिवस असेल…मग ते घरी आणल त्यावर इतके दिवस उलटुन गेलेत..

हे ऐकुन मात्र देवांश पूर्वा वर चांगलाच संतापला..त्याचा राग पाहून सोहम आणि गार्गी सुद्धा घाबरली..पूर्वा तिची बाजू सावरून त्याला म्हणाली, चारच दिवस झालेत ना?? त्याला काय होत?? फ्रीज मध्येच तर होत..मग ते चांगलचं राहणार ना?? ४ दिवसांनी काहीही फरक पडत नाही..

तीचं बोलणं ऐकुन देवांश ताटावरून न जेवताच उठून गेला..पूर्वा मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिली…

#भाग २

हल्ली असं रोजचं व्हायचं…सुरूवातीला त्याला वाटायचं होईल हळू हळू सगळ नीट ! पण पूर्वा दिवसेंदिवस बचतीच्या नावाखाली स्वतः बरोबरच कुटुंबाच सुद्धा नुकसान करून घेऊ लागली..

ऑफरच्या नादात गरज नसतांना खरेदी करायची..आणि मग तिने किती बचत केली हे देवांशला पटऊन द्यायची..

तिच्या ह्या स्वभावामुळे नक्कीच एक दिवस मोठं नुकसान होईल असं देवांश सारखं म्हणत राहायचा..पण पूर्वा वर त्याचा काहीच परिणाम व्हायचा नाही..

आधीच घरासाठी काढलेलं लोन, त्यात दर महिन्याला कार ची किस्त, देवांशच्या आईला शुगर, बिपी असल्यामुळे लागणाऱ्या मेडीसिंस, मुलांचं शिक्षण, पूर्वाची भिशी, हे सगळं एकट्या देवांशच्या भरवशावर !

त्याला वाटायचं वायफळ खर्च कमी केला तर महिन्याच्या अखेरपर्यंत जास्त अडचण जाणार नाही..पण व्हायचं उलटचं..

असंच एकदा मॉल मधून ऑफर मध्ये तिने बरीच शॉपिंग केली..ह्यावरून देवांश आणि तीचं कड्याकाच भांडण झालं.. ती रागातच माहेरी निघून गेली..

देवांशने मात्र ह्यावेळी आपण माघार घ्यायचीच नाही असं मनाशीच ठरवलं..पण सायंकाळी आईच्या आठवणीने मुलं रडायला लागली …आईने त्याची समजूत घालून पूर्वाला बळजबरी घ्यायला पाठवले..

तो तिला घ्यायला जातो..पण तिच्यासमोर तो एक अट ठेवतो ..की ह्या नंतर वायफळ खर्च बंद करायचा..त्यावर आधी नाही..नाही …म्हणणारी पूर्वा एकदाची हो म्हणाली… कारण तिला वाटायचं की ती उगाच खर्च करणाऱ्यातली नाही..

पण तिने मान्य केलं की ह्यानंतर ती जास्त खर्च करणार नाही…त्या नंतर काही दिवस मजेत जातात.. देवांशला सुद्धा वाटत की पूर्वा मध्ये चांगलाच बदल झालेला दिसतो..म्हणजे फारचं मनावर घेतलेलं दिसतंय ..

काही दिवसांनी सोहमचा वाढदिवस येतो..सगळेच वाढदिवसाच्या तयारीला लागतात..सायंकाळी सोहमच्या शाळेतील आणि शेजारचे मित्र येतात..घर छान डेकोरेट केलेलं..सगळीकडे आनंद भरून गेलेला ..

केक कापल्या नंतर मुलांना खायला देऊन रिटर्न गिफ्ट पण दिल्या जातं..

सगळे मुलं आनंदात आप आपल्या घरी जातात..त्यानंतर थोड्या वेळातच त्या मुलांचे आई वडील कंप्लेंट घेऊन येतात की त्यांच्या मुलांना ‘ फूड पॉइस्निंग ‘ झालंय..

देवांशच्या लागलीच लक्षात येत की हे सगळ पूर्वाने विकत आणलेल्या चिवडा आणि वेफर्स मुळे झालं असेल कारण जेव्हा त्याने नाश्त्यासाठी काय आणू विचारलं? तेव्हा तििचं म्हणाली होती की काहीही आणायची गरज नाही..

ती मुलांसाठी खायला स्वतः बनवणार होती..पण घरच्या खाण्या बरोबरच तिने विकतचं चिवडा आणि वेफर्स सुद्धा दिलेत.. नेमक देवांश ह्यावेळी कामांच्या गडबडीत ‘ एक्सपायरी डेट ‘ चेक करायचं विसरला..

त्यावर देवांश तिला काही बोलणारच काय ? तर पूर्वा रडायला लागली..पण आता तिला बोलून काही उपयोगच नव्हता.. तिला तसचं एकटीला सोडून सगळेच मुलांना भेटायला हॉस्पिटल मध्ये गेलेत..

मागाहून पूर्वा पण हॉस्पिटल मध्ये जाते पण तिच्याशी कुणी काहीच बोलत नाही..सुदैवाने मुलांना काही होत नाही.. मुलं बरी होतात.. मात्र ह्या सगळ्या प्रकारा मध्ये देवांश तिच्याशी बोलणं सोडतो..

देवांशचा अबोला तिला सहन होत नव्हता…म्हणून ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करायची..पण तो…हसती खेळती पूर्वा अचानक पार बदलून गेली..हे सगळ तिच्या सासूच्याही लक्षात येऊ लागलं..तिचा असा उदास चेहरा पहावत नव्हता.. त्यांनी देवांशला समजवण्याचा खूप प्रयत्न केला..

शेवटी त्याने त्याच्या आईच ऐकलं..पण काहीही केल्या त्याच्या मनातून पूर्वा मुळे मुलांना झालेलं ‘ फूड पॉइस्निंग ‘ विसरू शकत नव्हता..त्याच्या मनांत बऱ्याचदा येऊन जायचं , मुलांच्या जिवाचं बर वाईट झालं असत तर???

पण हळू हळू देवांश आणि पुर्वाच नातं पूर्ववत व्हायला लागलं होत..आता घरातलं वातावरणही आधीसारख हसरं खेळतं झालं होत..पण आनंदाचे,सुख समाधानाचे क्षण फार काळ टिकले नाही..

#भाग ३

एकदा घराची साफ सफाई करतांना पूर्वाला शुगरच्या गोळ्या दिसतात..ती, त्या चेक न करता तश्याच सासुबाईंच्या औषधींच्या डब्यात ठेवते ..तिथेही तिने बचतीचा विचार केलेला असतो..तिला वाटतं इतक्या कॉस्टली गोळ्या वाया कशा घालवायचा??

पण तिच्या हे लक्षात येतं नाही की त्या गोळ्यांची एक्सपायरी गेलेली असू शकते..आणि त्याचे साईड एफेक्ट मुळे जीवही गमवावा लागू शकतो..

काही महिन्यांपूर्वी देवांश त्याच्या आईसाठी  शुगरच्या  गोळ्या आणतो पण त्या आईला द्यायचं विसरतो. त्या तशाच टेबलच्या खणात पडून राहतात. नेमके त्याचं गोळ्या पूर्वाच्या हातात लागतात..

Expiry date गेलेल्या गोळ्यामुळे पूर्वाच्या सासूचा bp कंट्रोल होत नाही आणि त्यामुळेच त्यांना अर्धांगवायूचा झटका येऊन…त्या कायमच्या अंथरुणाला खिळल्या..
हे सगळ देवांशला कळल्या नंतर एकाच घरात राहून तो पूर्वापासून वेगळा राहायला लागतो..कारण त्याला त्याच्या मुलांपासून आई तोडायची नसते..

 पण तो मात्र त्याच्या आईच्या प्रेमाला कायमचा मुकला..त्याच्या आईच्या अशा अवस्थेला नकळत का होईना?? पूर्वा जबाबदार होती..तो २४ तास आईची काळजी घ्यायला एक नर्स ठेवतो आणि आईजवळ मात्र तो पूर्वाला फिरकू सुद्धा देत नाही..

पूर्वाच्या हलगर्जीपणामुळे एक सुखी कुटुंब उध्वस्त होत…

“बचत ” करणे हा जगातील प्रत्येक ‘ स्त्री ‘ चा जन्मसिद्ध अधिकार आहे..

पण त्याच बचतीच्या नादात कुणाचा जीवही जाऊ शकतो, हे आपण पूर्वाच्या अनुभवावरून शिकतो..

त्यामुळे बचत करा ,पण जरा जपून!

  ?योगिता विजय?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा