Extramarital Affair जरुरी होता है! भाग 1(Drama/Romance)

Written by

 

रात्रीचे दहा वाजलेले.. एका classy pub मध्ये नेहमीचंच वातावरण.. मंद प्रकाश.. काही मुलंमुली dance floor वर बेभान होऊन नाचत होते. मीरा मात्र आपल्यातच गुंतलेली, स्वतःतच हरवलेली, एकटीच bar tender समोर काहीतरी विचार करत बसली होती. अनिकेत तिला बराच वेळचा दुरून न्याहरत होता. तिने black colourचा शॉर्ट ड्रेस घातला होता. ती बऱ्यापैकी उंच आणि तिची figure एकदम sexy होती. एकदम slim नव्हती पण fit होती. तो तिला बघताच खूप impress झाला. तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या बाजूच्या chair वर जाऊन बसला. ती आपल्यातच गुंतलेली होती. शेवटी तोच म्हणाला,

“Hi, gourgeous!”

तिने त्याच्याकडे रागाने बघितले आणि उठून जायला निघाली.

“Hey! Sit down. जाऊ नकोस अशी. मी तर तू उदास दिसलीस म्हणून तुझ्याशी बोलायला आलोय.”

नंतर bartender  कडे बघून अनिकेत म्हणाला,

“One cocktail for the lady.”

ती परत बसून बारटेंडरला म्हणाली,

“I want JD on the rocks.”

आणि त्याच्याकडे एक कटाक्ष टाकत म्हणाली,

” and listen Mr. Despo., मुलगी आहे ते ही एकटी आहे म्हणजे आपल्याला  chance आहे. मुलगी आहे म्हणून एकतर cocktail आवडेल नाहीतर wine . How particular !I am alone here that doesnt mean I am available. See, I am married. Now just  leave me alone .” डावा हात वर करून तिने हातातली अंगठी त्याला दाखविली.

तो थक्क होऊन थोडावेळ तिच्याकडे बघतच राहिला आणि हसत म्हणाला, “Wow ! मला फक्त तू दिसण्यावरून आवडली होतीस पण तूला तर छान बोलताही येतं. Beauty with Brains . पण मी कुठे तुला इथे लग्नाची मागणी घालायला आलोय आणि by the way , माझंही लग्न झालंय. पण लग्न झाल्यावर affair करता येतं नाही असा काही नियम वगैरे पाळणारा मी नाही. ”

” मग मी काय करू?”

“तू लहानपणापासूनच अशीच आहेस का? म्हणजे डाकूराणी types ? प्रत्येक गोष्टीवर तलवार उचलणारी.” तो गोड हसून म्हणाला.

तिने त्याच्याकडे बघितलं, त्याची smile खूप मस्त होती. डाव्या गालावर खळी पडल्याने तो अजूनच charming दिसत होता. ‘डाकूराणी’ हा शब्द ऐकून तिला हसू येत होत पण तिने ते दाबलं आणि तसेच गंभीर हावभाव कायम ठेवले.

“Let me guess.  लग्नाला २-३ वर्षे झालीत, आता नवरा आधीसारखा राहिला नाही. तुला वेळ देत नाही म्हणून भांडण झालंय आणि तू तरातरा इथे निघून आलीस.”

त्यावर ती म्हणाली, “आणि तुझी काय स्टोरी आहे? बायकोशी पटत नाही म्हणून दुसरीकडे try मारतो आहेस का?”

“अरे, बापरे ! डाकूराणी जागृत झाल्या परत. चलो..मी निघतो.”

तो लगेच उठून जायला निघाला. तिला जाणवलं आपण उगाच येवढं चिडून बोललो. तिने लगेच त्याला विचारले,

“कूठे?”

“माझी girlfriend शोधायला..”

आणि तो  gate कडे वळला पण दुसऱ्याच क्षणी मागे वळून म्हणाला, ” By the way, I forgot my wallet.So, Don’t forget to pay your bill..”  परत गालावर खळी पाडून म्हणाला.

मीराने मनातल्या मनात शिव्या मारत bill pay केलं. तिच्या डोक्यातून तो जातंच नव्हता म्हणून ती ही लगेच त्याच्या मागे बाहेर पडली.

सगळीकडे शांतता होती. मीराला बघून तो म्हणाला,

“माझी जादू चालली वाटतंय तुझ्यावर?”

“जास्त हवेत उडू नकोस. I am not an easy catch Mr.. I was just curious..”

“Okay..चल मग पाणीपुरी खायला..”

“पाणीपुरी? आत्ता? ”

“माझ्या खिशात फक्त 50रुपये आहेत., So, I can afford only panipuri..”

बऱ्याच दिवसांनी मीरा चौपाटीवर आली होती. त्या रात्री पौर्णिमेचं चांदणं पडलं होतं. समुद्राच्या लाटांचा आवाज रात्रीच्या शांततेत स्पष्ट ऐकू येतं होता. निळ्या आकाशात चंद्र तर निळ्या समुद्रासमोर अनिकेत दोघेही तिला मंत्रमुग्ध करत होते. दोघांचाही नजरेचा लपाछपीचा डाव सुरू होता. तिने त्याच्याकडे बघितलं की तो इकडेतिकडे बघायचा आणि त्याने बघितलं की ती नजर चोरायची. In short, they were equally attracted towards each other..
पाणीपुरी खाऊन दोघेही जण समुद्राकडे पाहत बसले होते. तेवढ्यात,

“अरे वा यार! काय माल आहे! ” असं कुणीतरी मागून म्हणाल. बाकीच्या दोघांनी पण शिट्या मारणे सुरू केले. ती एकदम सतर्क झाली. अनिकेतला जाऊन बिलगली. त्या तिघांनी त्या दोघांभोवती घेरा घातला. अनिकेत मीरा खाली बसून एकमेकांना बिलगून आणि ते तिघे उभे.
“वाह! चिकनी की टांगे तो देखो..” त्यातलाच एक म्हणाला.
ती ड्रेस खाली ओढून पाय झाकण्याचा प्रयत्न करत होती पण तो short dress असा किती लांबणार होता. एक एक करून त्यातला प्रत्येक जण कधी अश्लील comments तर कधी गाणे म्हणत होता.
त्यातल्या एकाने मीराचा हात पकडून तिला अनिकेतच्या मिठीतून खेचण्यास सुरुवात केली. अनिकेत तिला घट्ट पकडून होता. अजून बाकीचेही तुटून पडणार तेवढ्यात अनिकेतने मीराला स्वतःपासून दूर लोटल आणि ओरडला,

“ले जाओ इसको. इसकी वजहसे ही मुझे AIDS हो गया है। मेरी जिंदगी बर्बाद हो गई है, इसकी वजह से..पता नहीं कौनसी घडी में ये मुझे मिली.ले जाओ इसको..”

क्रमशः

पुढचा भाग break के बाद.. Stay tuned..

प्रिय वाचक मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असल्यास likes, comments आणि share आणि मला follow करायला विसरू नका..

© 2018 Nisha Adgokar Rase

All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed, or transmitted in any form or by any means, including printing , photocopying, recording, or other electronic or mechanical methods, without the prior written permission of the writer, except in the case of brief quotations embodied in critical reviews. For permission requests, contact the writer Nisha Adgokar Rase on [email protected]

 

Article Tags:
· · · ·
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा