Extramarital Affair जरुरी होता है! भाग 2(Drama/Romance)

Written by
 • मीराला काय करावे थोडावेळ सुचतंच नव्हते. ती ह्या प्रकाराने आधीच घाबरलेली, त्यात अनिकेतची अशी बडबड. ‘ AIDS’ हा शब्द ऐकताच त्या तिघांनी तिथून धूम्म पळ काढला..
  ते दिसेनासे झाल्यावर मीरा अनिकेतवर ओरडून म्हणाली,

  ” What the hell! AIDS, जिंदगी बर्बाद , काय बडबड करत होतास?”

  अनिकेत परत हसला, “मग मी काय करावं असं तुला वाटतं.. biseps बघितले होतेस का त्यांचे? मी काही हिंदी सिनेमातला hero वगैरे वाटलो की काय तुला? त्या तिघांना मी फराळालाही पूरलो नसतो. चटणी केली असती त्यांनी माझी. आणि मग तुझीही..”

  “म्हणून काय मला AIDS आहे असं सांगणार तू..” आणि ती त्याच्या मागे धावू लागली आणि तो हसत हसत तिच्यापासून दूर समुद्राकडे पळू लागला. तिला समुद्राच्या पाण्याचेही भान उरले नाही. लाटांमधे ते दोघेही सामावून गेले. वाळूसोबत तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. ते बघून लगेच अनिकेत तिला वाचवायला गेला. अनिकेतने तिला उचलून पाण्याबाहेर काढले. दोघेही नखशिखांत भिजले होते.अनिकेत समोर बघत होता आणि मीरा त्याच्या मिठीत असतांना त्याच्याकडे. अचानक अनिकेतने मीराकडे बघितले पण ह्या वेळी मीराने नजर दुसरीकडे वळवली नाही. ती हसली आणि मग तो ही. तिने अलगद त्याच्या खळीवर तिचे नाजूक ओठ टेकवले. त्याच्या अंगावर रोमांच उठले. त्याने तिला हळूच खाली उतरवले. ती त्याला जाऊन बिलगली.

  तेवढ्यात अनिकेत तिला म्हणाला, “Madam, तुमचं लग्न झालंय. आणि काही तासांपूर्वी तुम्हीचं मला म्हणाल्या होतात की You are not an easy catch म्हणून..”
  ” हो Mr. पण तुम्हीही म्हणाला होतात की लग्न झाल्यावर affair करायचं नाही असं काही तुमचं मत नाही..”
  आता अनिकेतला काय बोलवे सुचत नव्हते.
  पुढे मीराच म्हणाली, ” चल, आपण माझ्या घरी जाऊ. आपले कपडेही ओले झाले आहेत .माझा नवरा ही घरी नाही. So, We can have some privacy there.”
  अनिकेत अडखळत म्हणाला, “घ..घ.. घरी कशाला?”
  “क्यूँकी मेरी तुम पे बुरी नजर है..”
  आता अनिकेतला एकदम shock झाल्यासारखा मीराकडे बघू लागला.
  ती हसत म्हणली, “क्यूँ Mr.? डर गए क्या डाकुराणीसे?थोड्या तासांआधी तर खूप मोठा casanova type बनत होतास..”
  आणि परत ती अनिकेतला जाऊन बिलगली..
  “Okay..Okay.. Please stop this..please stop..तू जिंकलीस, मी हरलो.. मीरा, I can’t imagine you like this. please, please, please stop..”
  मीरा मोठमोठ्याने हसू लागली, “तुझा चेहरा बघं एकदा आरश्यात.. Oh my god ! भीगी बिल्ली झालायस तू..”
  मीरा मोठमोठ्याने खळखळून हसु लागली.
  अनिकेतने तिला जवळ ओढले, “Finally, I got my girlfriend back.” असे म्हणून तिच्या ओठांवर kiss केले.
  नंतर त्याने तिच्या डोळ्यांत बघून प्रेमाने म्हटले,

  “Happy Anniversary, बायको..”

  “चला, म्हणजे मी रागारागाने घरातून का निघून गेले ते शेवटी कळलं तर. Happy anniversary to you too अन्या! ”

  “मला कसली happy anniversary? मेरी तो बर्बादी का दिन है आज..” तो मिश्किलपणे हसून म्हणाला..

  “बर्बादी काय? मला AIDS काय? नालायक, मेल्या अन्या..मी आहे म्हणून तुला झेलतेय नाहीतर बिन लग्नाचाच राहिला असतास..”

  अशी म्हणत ती त्याला ठोशे मारू लागली.
  “अरे, वाचवा रे कुणीतरी मला ह्या डाकुराणी पासून..”असं ओरडत अनिकेत इकडे तिकडे पळू लागला..
  दोघेही धावून धावून दमले आणि वाळूवर एकमेकांच्या बाजूला जाऊन पडले.. दोघांचेही श्वास हळूहळू नॉर्मल होत होते..
  दोघांनीही एकाच वेळी एकमेकांकडे बघितले.
  त्याच्या गालावर परत ती सुंदर खळी पडली.
  ती त्यावर बोट फिरवून म्हणाली, “सगळा दोष ह्या खळीचा आहे. दरवेळी सगळे रुसवेफुगवे विसरून मला तूझ्या प्रेमात पडायला ही भाग पाडते..”
  “असं का? सगळं credit खळीलाच..”

  “बरं..तू ही बरा दिसतोस कधीकधी” ती गुदगुदू लागली.
  “बरा..बरा..” असं म्हणून तो मीराला गुदगुद्या करू लागला. ती खळखळून हसु लागली.

  “मीरा, I am so happy.. I got my girlfriend back..बायको झाल्यावर तूझ्यातली girlfriend कूठेतरी हरवली होती. आहेत माझ्यात बरेचसे दोष. चुकतो मी ही.. कधी towel bed वर सोडतो. कधी birthday तर कधी anniversary विसरतो ..आज तर wallet सुद्धा विसरलो. पण तुझ्यावरच प्रेम कमी झालंय असा त्याचा अर्थ नाही. कामाच्या tensionमुळे सगळा गोंधळ होतो त्यामुळे दुर्लक्ष होतं बऱ्याचदा पण तुझी हृदयातील जागा कमी झाली असं नाही. आम्ही पुरुष नाही ग करू शकत तुम्हा स्त्रियांसारखं multitasking.. please तू मला समजून घेत जा. रूसत जा पण अशी सोडून निघून जात जाऊ नकोस.. मी नाही जगू शकतं तूझ्याशिवाय..”

  “पण मला तर आवडलं हे..असलं पुन्हा अनोळखी होणं..पुन्हा नव्याने भेटणं..पुन्हा तुझे फालतू jokes आणि flirting ऐकणं आणि पुन्हा नव्याने तुझ्याच प्रेमात पडणं..”

  “ते तर आहे..ह्या जन्मी तरी तू फक्त माझीच आहे..मला माहिती आहे..दुसरा कुणी तुला झेलेल असं वाटतं नाही..” अनिकेत परत मिश्किल हसला..

  “दुसरा बघायचा chance ही मिळाला होता की आज पण तूच वेताळ बनून पाठीमागे लागलाय तर माझ्यासारख्या बिचाऱ्या विक्रम ने काय करावं..”
  मीराच हसणं बघून अनिकेत डोळे भरून तिला पाहू लागला.

  “I love you, मीरा..नेहमी अशिच हसत रहा.”
  “I love you too , अन्या.. आपली third anniversary आतापर्यंतची best anniversary होती..gifts  नाही, dinner नाही पण romantic..असं extramarital affair अधूनमधून करत राहिलं पाहिजे आपल्या नात्यातला नवेपणा टिकून राहण्यासाठी..”

  “बरं..तो madam चले क्या आपके घर..husband घरपे नहीं है..मौके का फायदा उठाते है..”

  “हाँ..चलो जानू.. अपने प्यार के दुश्मन, इस जालीम जमानेसे छुपछुपके मिलने का मजा ही कुछ और है..”
  आणि ते दोघेही वाळूने माखलेले असतांना एकमेकांच्या मिठीत हसून सामावून गेले..

  इसलिए तो कहती हूँ,

  Extramarital Affair जरूरी होता है! ! !
  समाप्त..
  कथा वाचल्याबद्दल खूप खूप आभार, मित्रमैत्रिणींनो..Likes, comments, share आणि मला follow करायला विसरू नका..
  हसत रहा, प्रेम करत रहा.. आणि

  पुन्हा पुन्हा नव्याने प्रेमात पडतं रहा..

  © 2018 Nisha Adgokar Rase

  All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed, or transmitted in any form or by any means, including printing , photocopying, recording, or other electronic or mechanical methods, without the prior written permission of the writer, except in the case of brief quotations embodied in critical reviews. For permission requests, contact the writer Nisha Adgokar Rase on [email protected]

Article Tags:
· · · · ·
Article Categories:
मनोरंजन

Comments

 • खूप छान
  शेवटचा twist आवडला

  Sarojkumar Ingale 21st जून 2019 7:14 am उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत