Future and near future

Written by

Future and Near future……

आयुष्यात काही गोष्टी खूप महत्वच्या आहेत, त्या आपण नहमी दुर्लक्षित करतों एक वाढ़त असलेल वय, आपल शरीर आनी तीसरे आयुष्य जगत असताना घेयाचा आनंद, आजकाल आपण office मधे म्हणा किंवा इतर कामां मधे इतके busy असतो की दिवस कधी निघुन जातो हे सुद्धा समजत नाहीं, एका मागे एक वर्ष उलटत जातात आनी अचानक कधी आपन तिशीच्या पुढे गेलो हे देखील समजत नाही…लग्ना नंतर तर आपला पूर्ण वेळ आपण मूलांचे भविष्य secure करण्याचा पर्यन्त करत असतो… भविष्य सुधारण्यचा प्रयत्न करत असताना वर्तमान मधे जे कही क्षण आपण अजुन चांगल्या प्रकारे, आनंदने जगु शकतो ते सर्व आपण भविष्यावर सोडुन देतो, भविष्यात काहितरी चांगल होईल आनी नंतर आपण आयुष्याचा चांगल्या प्रकारे उपभोग घेवु या आशेवर आपले दैनिक चक्र चालु असते,
पण हे सर्व करत असताना आपण हे विसरतो की वेळ सुद्धा पुढे जात आहें, हे सगळ करत असताना आपन आपल्या शरीराकड़े पण दुरलक्ष्य करतों, वया नुसार आपले diet जे change करायला हवेत ते आपण करत नाही, पुरेसा व्यायाम करत नाही..त्याचा परिणाम अर्थातच मधुमेह, हृदय रोग आनी इतर आज़ार…आयुष्यात जे काही करायच असत ते तसच राहुन जात आनी शेवटी आपल्या कड़े निर्णय घेन्याची क्षमता सुद्धा राहत नाही.

भविष्याचा जास्त विचार करण्यापेक्षा आपण आपला वर्तमान कसा चांगल्या प्रकारे आनंदने जगु शकतो या विषयावर विचार केल्यास नक्किच फ़ायदा होईल, आणी या सर्व गोष्टिंचा विचार करण्यासाठी स्वतला पुरेसा वेल देन हे ही गरजेच आहें, सूट्टी च्या दिवशी १ तास ज़री आपण एकांत ठिकानी बसून विचार केला तरीही खूप काही निर्णय घेवु शकतो.
मुलांच आनी घरच्यांच future secure करण हे आपल कर्तव्य आहें पण हे सगळ करत असताना स्वतः च्या आनंदा कड़े आणी शारिराकड़े दुरलक्ष्य करणे हे ही तितपथ योग्य नाही.
ज्या काही गोष्टी करायच्या आहेंत त्या near future प्लान मधे आसल्या तर त्याचा फ़ायदा नक्किच होतो. भविष्यावर जास्त अवलंबुन न राहाता जे कही शक्य असेल ते वर्तमान मधे करण्याचा पर्यन्त केला तर योग्यच.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत