Happy Friendship Day

Written by

Happy friendship day…..

आठवड्याभराचा पसारा आवरत झोपायला जवळपास २ वाजले म्हणून तिची Sunday सकाळ आज जरा उशीराच झाली..
रेवा.. पुण्यातल्या एका MNC मधे Job करणारी एक २५ वर्षीय, smart,talented पण जरा emotional,हळव्या मनाची मुलगी..थोडीशी चिडकी सुध्दा..फुग्गा अगदी नाकावर असायचा..
रेवा हडपसर मधे flat भाड्याने घेवून राहत होती.. अजून तरी कुणी room partner न मिळाल्याने “एकटा जीव सदाशीव..” असं चाललेलं..
घरी आलं की flat जसा खायला उठायचा.. मग काहीतरी वाचत नाहीतर आवरत बसावं..एकटेपणा जास्तच असह्य झाला की गुपचूप थोडं रडून घ्यावं..
रेवा आधीपासून अशी मुळूमुळू नव्हती..एकदम चुलबुली..स्वतःवर आणि आयुष्यावर भरभरून प्रेम करणारी,कधी painting मधे ,तर कधी पानाफुलांत रमणारी..छान गाणं म्हणणारी,आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगणारी..एक नंबरची foodie..पुण्यात कुठे काय खायला चांगलं मिळतं..याची इत्थंभूत माहिती असलेली..बाहेरच नाही तर रिकाम्या वेळेत घरातही वेगवेगळ्या recipes try करून मस्त ताव मारणारी..या सगळ्यात तिचा partner..म्हणजे partner for food,partner in crime..तिचा #BFF#ढोल सोबत असायचा..
तसं त्याच्या आईबाबांनी त्याचं नाव खूप चांगलं ठेवलेलं-ओम..
पण नाव तब्बेतीला suit व्हायला पाहिजे म्हणून रेवा madam ने बिचाऱ्या ओम चा ढोल केलेला..
मग कधी ढोल,ढोल्या, ढोलूराम,ढोलोबा अशी अख्खी बाराखडी तयार व्हायची..तोही तिला काळी म्हणायचा..
दोघांची मैत्री म्हणजे तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना..जसे Tom &Jerry च..

तर आपली रेवा आज आळस देतच जवळपास ९ वाजता जागी झाली..आज काय करायचं मनात विचार चालू झाले..रविवारी डोक्याला ताण नको म्हणून घरातली pending कामं पण कालच संपवली..बरं TV पण फारसा आवडायचा नाही..आता काय चा question mark मनात असतांनाच What’s app ची Notification Tone वाजली.. Open केले तर ढीगभर messages..आज कोणत्या खुशीत एवढे messages बघू म्हणून तिने एकावर click केलं तर

” मैत्री म्हणजे ….bla bla bla…”
पूर्ण वाचायचेही कष्ट घेतले नाही.. ohh तर friendship day आहे आज ,म्हणून एवढं ऊतू जातंय ..
नुसता सगळा Show Off.. Aing ..काय बोलतेय मी ..
मागच्या वर्षापर्यंत मीही किती हौसेने ह्या सगळ्यात भाग घ्यायचे..८-८ दिवस आधीपासून plan ready असायचा..
झरझर डोळ्यासमोरून तो काळ गेला..
तो दोन वर्षांपूर्वीचा friendship day..
ढोलपेक्षाही सुमीमुळे जास्त लक्षात राहीलाय..
स्वतः खपून खास Greeting बनवलेलं ..आणि मोठ्ठ्या अक्षरात लिहीलेलं..
“HAPPY FRIENDSHIP DAY DHOLYA….”
त्याला तर खूप आवडलं..पण त्या बिनडोक सुमी ने पाहीलं नि लागली खोखो खिदळायला.. त्याला ढोल्या ढोल़्या चिडवायला लागली.. माझं डोकंच फिरलं ..असा मस्त जोरात आवाज काढला ना तिच्या कानाखाली..आयुष्यात विसरणार नाही कधी..त्याला ह्या नावाने बोलवायचा हक्क फक्त माझाय म्हटलं..’Sorry ‘म्हणून पळाली मग कार्टी..

मागच्या वर्षाचा friendship day तर अजूनच भारी..मी त्याचा favorite chocolate cake बनवून ठेवला आदल्याच दिवशी..
त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तयार व्हायला सांगितलेलं..कुठे जायचं ?काय काहीच माहीत नाही..
बस Ready रहा म्हणे
..Surprise द्यायला आवडायचं त्याला..
मला Bike वर भटकायला जाम आवडतं म्हणून गाडी Direct Mumbai-Pune Express Highway वर..
सीधे लोणावळा..
थंडी..
धुकं..
भुट्टा..
Maggie..
केक..
आणि खादाड आम्ही..
लईच भारी celebration ..
आता घरी जाऊन मस्त ताणून देण्याच्या विचारात असतांना अजून एक surprise आहे म्हणे..
CCD ला bike थांबली..
रेवा-अरे आता भूक नाहीये
ओम-गपे खादाड ..coffee प्यायला नाही आणलंय तुला इथे.. तिकडे बघ..
आतून एक रेड वनपीस .. व्यवस्थित वर बांधलेले केस..
काजळ भरलेले टपोरे डोळे..
एक मुलगी चालत येत होती..
रेवा-आता ही कोण बया?? कोपराने ढुशी देऊन हळूच त्याला विचारलं..
ओम -अगं.. Surprise..Meet my girlfriend- मीरा..
रेवा-कााााय?????कधी झालं हे..
ओम- मागच्याच महिन्यात..पण तुला surprise देण्यासाठी छान occasion शोधत होतो..
रेवा-Ohh म्हणजे महिनाभर तू ही गोष्ट माझ्यापासून लपवलीस..आता कशाला उपकार..
एक अक्षर बोलू नकोस..तिच्याशीही पहिल्याच भेटीत एक अक्षरही न बोलता मी तिथून निघून आले.. नाही त्याच्यामधे तसल्या प्रकारचा काही interest नाही मला पण आमच्या मैत्रीमधे तिसरी कुणी येणार आणि आमची मैत्री तुटणार हे अजिबात मान्य नाही मला..त्यानंतर तो फोन करायचा,घरी यायचा पण मी जेवढ्यास तेवढं बोलून कटवायचे..राग घालवायचा प्रयत्नही केला त्याने पण मी फारच हाडतूड केली.. आता वाटतं काय चुकलं त्याचं..प्रेम तर आयुष्यात कधी ना कधी येणारच होतं त्याच्याही आणि माझ्याही..फक्त ते त्याच्या आयुष्यात आधी आलं म्हणजे तो वाईट असं नाही ना..जाऊ दे आता हे सगळे विचार करून काय फायदा..आता तर तोही कधी फोन करत नाही..आजही त्याने साधा message पण केला नाही..
आठवण तर येतेच आहे त्याची..ऊंहू..
मीच करू का फोन..
टिंग टाँग..बेल वाजली..
ढोल्याााा……..
कित्ती दिवसांनी…….
आनंदाचं रडू फुटणार होतं आता..
त्याआधीच –
ओम-madam तयार व्हा..
रेवा-कशाला??कुठे जायचंय??(परत थोडा attitude दाखवू म्हटलं)
ओम- ए काळे..अशी नाटकं चालू रहाणार असतील तर जातो मी परत
रेवा-गप रे शहाण्या..थांब.. पळतच जाऊन पटापट आवरलं..किती दिवसांनी गाणं गुणगुणले मी..बेस्टफ्रेंड खूप दिवसांनी भेटण्याचा आनंद किती भारी असतो ना..
पुन्हा Bike Ride..
सिंहगड..
पाऊस..
खेकडाभजी..
दही..
ताक..
सुख..
Full enjoy करून परत निघालो तरी साहेबांनी मीराचं एकदाही नाव घेतलं नाही..ब्रेकअप झालं की काय..विचारूनच टाकू..
रेवा-काय रे मीरा काय म्हणते..
ओम-क्कााा़य?? काय विचारलंस तू..मीराबद्दल तू विचारतेय??मी जागाच आहे ना??
रेवा-(चांगली जोरात चिमटी काढून ..)हो बाबा मीच विचारतेय तू सुध्दा पूर्ण शुध्दीवर असतांना..
ओम- तुला मीरा आवडत नाही ना?
रेवा-तसं नाही रे..पण तिच्यामुळे आपल्या मैत्रीत फुट पडेल असं मला वाटलं
ओम- रेवा.. आमचं खूप प्रेम आहे गं एकमेकांवर आणि तिला माहितीय आपली मैत्री कशीये ते..तुझ्याशिवाय मी खूष राहू शकत नाही ओळखून आहे ती..म्हणूनच तुझा फुग्गा घालवायला आज मला सगळा plan करून पाठवलं तिने..प्रेम प्रेमाच्या जागी आणि मैत्री मैत्रीच्या.आपल्या मैत्रीबद्दल गैरसमज ती करत नाही कारण माझ्याशिवाय जवळचा कुणीच मित्र नसलेल्या तिला मैत्रीबद्दल खूप आदर आहे..मी तिलाही चल म्हणत होतो पण तुला आवडणार नाही म्हणून नको बोलली ती..
रेवा-(आज कधी नव्हे ते तो मला रेवा बोलला..मीरा नाही पण मीच कदाचित आमच्या मैत्रीत दुरावा यायला कारणीभूत आहे..आता केलेली चूक सुधरायची ..मी ठरवलं.. हळूच मोबाईल unlock करून फेसबुक उघडलं..जवळपास वर्षभरापासून Pending पडलेली “मीरा मते ” तिची friend request accept केली..तिचं profile open केलं.लगेचच notification आलं..

“Today is her Birthday. ”
श्यााा..आज आमच्या मैत्रीसाठी तिने तिचा birthday celebrate न करता याला इकडे पाठवलं होतं..
मला आता ओशाळल्यासारखं झालेलं…
रेवा-तिचा Birthday सोडून माझ्यासोबत कशाला आलास माकडा..
ओम-अगं तिनेच बळजबरी पाठवलं..
रेवा-आणि तू ऐकलंस..मूर्ख..
आता तिला फोन कर आणि मी सांगते तसं सांग..कळलं..??
ओम-बरं..
Calling..Meera…..

मीरा-बोला राजे..
ओम -मीरू..मीरू..
पटकन इकडे रेवाच्या घरी ये गं..
ती फारच चिडलीये आपल्यावर आमचं भांडणच चाललंय मघापासून ..आतातर तिने स्वतःला रूममधे लॉक केलंय..मला फार भिती वाटतेय गं..तू तू लवकर ये इकडे..
मीरा- तू घाबरू नको राजा..मी आलेच काही होणार नाही तिला हं..आलेच मी..तू शांत रहा..g

अगदी धावतपळत मी पोहचले..बेल वाजवूनही दार उघडेना..आता जास्तच tension येत होतं..
हलकेच दरवाजा ढकलला..आणि..
Happy birthday to u..
Happy birthday to u..
Happy birthday dear Meera..
Happy birthday to u…
…..

केक..
फुगे..
candles..
Gifts..

आणि समोर हसऱ्या चेहऱ्याने उभे ते Tom&Jerry..

सगळे खूष खूष ..
मीराचा birthday , रेवाचं Sorry आणि तिघांच्या मैत्रीचा हा Special Friendship Day
आणि त्यावर चारचांद लावणारं..
रेवाचं गाणं…

  • “यारा तेरी यारी को मैने तो खुदा माना..
    याद करेगी दुनिया..
    तेरा मेरा अफसाना..

-प्रणाली

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा