Jenny Aunty

Written by

आपलं या व्यक्तीसोबत आपल्या रोजच्या,रेग्युलर नात्यांपेक्षा काहीतरी वेगळंच नातं आहे असं वाटायचं !

वास्तविक तिला आम्ही आंटी किंवा काकू म्हणावं असं तिचं वय नव्हतं,ती आमच्या आजीच्याच वयाची पण आजी म्हणण्यापेक्षा आंटी म्हणल्यावर आम्हाला भारी वाटायचं,

गावामध्ये तिच्याबद्दलचं मत फारसं काही चांगलं नव्हतं.तिला कुणी असं तोंडासमोर येऊन वाईटसाईट बोलत नसलं तरी एकटीच राहत असल्यानं तिचं नाव चांगल्या कारणासाठी कुणी घेतच नसे.लहान मुलांच्यात मात्र ती त्यांची लाडकी जेनी आंटी होती !आणि याचं कारण होतं तिच्याकडं असलेली,कधीही न संपणारी गोष्टींची पोतडी ! तिच्याकडं कुठल्याही वेळी गेलो तरी तिच्या गोष्टी तयार असायच्या आणि त्या भूत प्रेत,चेटकीण,शापित परी, काळी जादू या अशा खतरनाक असायच्या !

या सगळ्यात तिला जरा जास्तच रस होता.या गोष्टी तिनं कुठे वाचलेल्या होत्या कि तिला कुणी सांगितलेल्या होत्या माहित नाही. आता वाटतं कि कदाचित ती स्वतःच अशा गोष्टी तयार करत असावी.तेव्हा लहान असलो तरी हा प्रश्न पडायचाच कि आंटी एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी आणते कुठून ?

विशेष म्हणजे आमच्या गावच्याच आजूबाजूचा परिसर तिच्या गोष्टींमध्ये असायचा.

जणूकाही आम्ही जिथं राहत आहोत तिथंच हि सगळी पात्र जन्माला आली,तिथंच राहात होती आणि अजूनही राहात असावीत ! शनिवारी शाळा सुटली रे सुटली कि आमचा मोर्चा अंटीकडे पोचायचा.मग संध्याकाळ काय, रात्र काय,वेळेचं भान कुणाला राहायचं ? तिनं गोष्ट सुरु केली कि सगळे गुंग होऊन जायचे.पण गोष्टींच्या आधी प्रत्येकाला तिनं खास घरी बनवलेली एकेक पेस्ट्री मिळायची.ती पेस्ट्री,केक असले विदेशी प्रकार फार उत्तम बनवायची,एक खाऊन हौस भागायची नाही पण दुसरीपण कधी मिळायची नाही,मग थेट पुढच्या शनिवारी ! या पेस्ट्रीची,केकची आणि ती गोष्टीतून जे जग उभं करायची त्यात रमून जायची आम्हाला अक्षरशः चटकच लागली होती.

आजही कुणी ‘एकदा काय झालं…’ असं म्हणून बोलायला सुरुवात केली कि जेनी आंटी आठवल्याशिवाय राहत नाही.आता ‘एकदा काय झालं..’ म्हणायला ना आजी शिल्लक राहिलीये आणि ना ते पेस्ट्री,केक किंवा बेसनाचे लाडू खात ऐकत बसायला नातवांना वेळ आहे.Skype वरून कधीतरी २ मिनिट दिसणारी आजी एक लाडू देऊन संपूर्ण जेवल्यासारखं आपलं पोट भरवू शकते किंवा फक्त गोष्टी सांगून परीचं आणि राक्षसाचं जग आपल्या डोळ्यासमोर उभं करू शकते हे तरी नातवाला आणि नातीला कसं आणि कुठून पटणार ?

गावाबाहेरून एक मोठंथोरलं ओढा वाहतो. मारुतीचं मंदिर आणि त्याच्या मागं मोठा डोह,आजूबाजूला खुपसारी चिंचेची झाड पसरलेली होती.उन्हाळा आला   कि गावातली पोरंटोरं तिकडं.संध्याकाळपर्यंत कायम गर्दी असायची.अंधार पडल्यावर मात्र तिथली वर्दळ कमी व्हायची.शांततेत पाण्याचा खळखळाट आणि पानांची सळसळ स्पष्ट ऐकू यायची.अंधार पडल्यावर तिकडं कुणी जाऊन आल्याचं कळलं कि आम्ही त्याला शूरवीरच समजायचो.

यात भर पडली ती जेनी आंटीच्या गोष्टीची !

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा