Love u जिंदगी sss

Written by

हल्ली लोकं उठ-सूठ मरायला (सॉरी सॉरी स्वतःला मारून घ्यायला) टपलेत. मरण्याचं पेव फुटल्यासारखं झालय जिथे तिथे, ह्याव झालं मारा उडी, त्याव झालं लटका पंख्याला, इकडे टोचलं, तिकडे चिमटलं, आईने डोळे वटारले, बाबाने चापटी मारली, दिल तुटला, जीव वीटला, काय अन काय!!!!

मिळतात तरी कुठून यांना एवढी कारण यार !!!!

जगण्यासाठी नाही शोधावीशी वाटत का किमान दोन तीन तरी …………..???

काय तर म्हणे बॉयफ्रेंड ने रिस्पॉन्स नाही दिला, अरे गेला खड्ड्यात असला बॉयफ्रेंड, त्या जब वी मेट वाल्या गीतला तरी आठवायचं, घालायच्या शिव्या, काढायची भडास, व्हायचं मोकळं………..

करून टाकायची बिन पाण्याची…………(हsजाsमsत)

काय तर म्हणे दोन चार का पाच पन्नास मार्क हुकले, अरे हुकेनातका, म्हणून काय स्वतःची जिंदगीच हुकवून टाकायची………..एवढं प्रेशर खरचं कुणी टाकलं होतं का तुमच्यावर???

बरं, त्या मरणाऱ्यांचं कौतुक ते किती, टीव्हीवर दिवसातून पन्नास वेळा त्याच्या क्लीपा दाखवल्या जातात, मोबाईलवर हौसेने फॉरवर्ड केल्या जातात, बघा बघा कशी उडी मारली, कसं जाळून घेतलं, कसे लटकलेत ; जवळून बघा, अगदी नीट निरखून बघा, अशानेच या पळपुट्यांना चेव चढतो. जीव देणं हा सर्व छोटया मोठ्या समस्यांवरचा जालीम उपाय वाटतो त्यांना!! तुम्हाला दाखवायचय ना दाखवा; पण त्यानंतर पाच माणसं अशी दाखवा, जी तग धरून राहिली, त्यांनाही मरावसं वाटलं, पण ती लढली, टिकली आणि वर आली, जीवनाच्या प्रेमात पडली.

पळपुट्यांचा काय तो उदो उदो…….

हे मरणारे मोठे शहाणे आणि आम्ही जगणारे येडे का मग????? आम्ही करतो ढिsशुम्म ढिsशुम्म आमच्या दुःखाशी, भीतीशी, मनाच्या अस्वस्थतेशी; पळवून लावतो साऱ्यांना प्रयत्नपूर्वक………

आम्हाला पण नैराश्याची बाधा होतेच की कधी मधी, रेल्वे ट्रॅक आम्हाला पण दिसतो, गच्ची, पंखे, चाकू-सुऱ्या, झुरळं मारण्याची औषधं, आमच्या घरी पण आहेत आणि हो रॉकेल, पेट्रोल, काड्यापेट्या सुद्धा easily avilable आहेत.

पण आम्ही त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही, आम्हाला दिसतात आमचे जिवलग, अशा वेळी आठवतो आम्ही त्यांच्याबरोबर घालवलेले सुंदर क्षण, आमचं त्यांच्यावर आणि खरंतर स्वतःवरही खूप खूप प्रेम आहे.

राग, इगो बिगो आम्हालाही आहेतच की , पण त्यांना गोंजारून आम्ही स्वतःच्याच जीवावर नाही उठत. जरा धीरानं घेतो आम्ही………..

खाचखळगे आम्हाला पण लागतात कित्येक , हेंदकळत का होईना आम्ही पुढे सरकतो, बरेचदा धsपकन आपटतो सुद्धा, पण तरीही उठतो ……….कधी हसत, कधी रडत, कधी इवळत तर कधी धुसफूसत……..

सांगतो ठणकावून त्या सगळ्या बागलबुवांना

Do whateverrrrrr you want to do ……….

Will never ever give up………

Yessss, आम्ही मस्त जगणार आनंदाने गुणगुणत ………

Love u जिंदगीsssss ?? ? ?

Love u जिंदगीssss????????

 

©️स्नेहल अखिला अन्वित

 

फोटो साभार: गुगल

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत