Avyakt Bhushanoffline

0.0 rating
0 out of 5
0 ratings
 • India, Jalgaon
 • 3

  Posts

 • 0

  Comments

 • 213

  Views

 • Avyakt Bhushan 3 weeks, 5 days ago

  कधी कधी पेटून उठावं वाटतं. पण काही वेळा शांत राहावं लागतं. कळतच नाही काय करावं.
  कुठलं पाऊल चुकीचं आहे?
  कुठलं बरोबर? काहीच कळत नाही.
  आपल्याला जे बरोबर वाटतं ते बाकीच्यांना चुकीचं तर वाटत नाही ना?
  मी जे करणार आहे त्यात त्यांना त्रास तर नाही ना होणार?
  त्यांना त्रास देऊन मी कसा खुश राहू शकतो?
  ते तर जवळचे आहेत मग त्यांचा विचार करायला हवा ना?

  म्हणजे आधी लोकांचा विचार करण्यात कधी दिवस निघून जातात कळत नाही. मग वर्ष वर्ष त्याच भीती मध्ये काढून घेतल्यावर कळतं, एकदम शेवटी कळतं, अरे तेव्हा आपल्या मनाचा विचार लोकांनी केला नाही आणि आपण करत बसलो.
  इतक्या उशिरा का कळत असेल बरं?
  कारण लोकं तेव्हाही आपला विचार करत नव्हते, लोकं आजही आपला विचार करत नाहीत.

  शेवटी उरतो तो फक्त ज्या क्षणांत प्रयत्न करून , जिद्द धरून सगळ्यांना फाट्यावर मारून आपलं मन काय मागतय ते मिळवायचं सोडून त्या क्षणांना रडून रडून, दुसऱ्याचं ऐकून सरता केल्याचा पश्र्चाताप…

  मनाच्या तळाशी काही कुणकुण जरूर राहून जातात…
  हे जगणं आपण स्वतः सुंदर बनवू शकत होतो ना ?
  बनवायलाच पाहिजे होतं ना..?
  मग खूप वर्षांनी कुणकुण करत बसण्यापेक्षा, आताच बनवायचं का हे जगणं सुंदर?
  ह्या क्षणापासून?
  करता येतात ना प्रयत्न, स्वतःसाठी?
  <3
  #अव्यक्त_भूषण…
  (फोटो स्रोत गुगल)

Earning 0 /
Newbie

Recent posts

#अव्यक्त_2

अव्यक्त भाग १

थोडी हिम्मत केली असती तर???