Avyakt Bhushanoffline

0.0 rating
0 out of 5
0 ratings
 • India, Jalgaon
 • 3

  Posts

 • 0

  Comments

 • 213

  Views

 • Avyakt Bhushan 3 weeks, 3 days ago

  “अव्यक्त” (भाग १)
  तो पेपर मध्ये “अव्यक्त” म्हणून एक कॉलम लिहायचा. त्याचं फक्त नाव असायचं लेखाच्या खाली. त्याने खूप सारे अव्यक्त विषय खूप छान पद्धतीने मांडले होते.
  त्याचे वाचक खूप, त्यातलीच एक वाचक होती जी नेहमी तिची प्रतिक्रिया पाठवत असे.
  त्याचं लिखाण वाचता वाचता ती त्याला वाचू लागली.
  तिला तो आवडायला लागलेला. तो कोण होता तिला माहित नव्हतं. पण रविवारी पुरवणी आली की ती खूप आतुरतेने त्याचा लेख वाचायला घेई.
  पण तिचा विषय खोल होत चालला होता. तिने एका प्रतिक्रियेत त्याला सांगून टाकलं की “मला तू आवडतोस”.
  तो खूप काही लिहून अनुभवाचा धनी झालेला. त्यालाही तिची खूप सवय झालेली. तो ही आता ती वाचेल ह्या अनुषंगाने लिहू लागलेला.
  त्याने तिला एका लेखामधून इशारा कळवला. त्याचे लेख ती नेहमी वाचायची आणि तिला हा इशारा लगेच कळाला.
  तिने तोडके मोडके शब्द जमवून जमवून त्याला एक शायरी पाठवली
  मेरी हर दोपहर भी दो पहरो से जादा पहरो की हो गयी है
  सुखीं सुखीं हैं सुबह और राते भीं सुखीं हैं…
  त्याला तिचा इशारा झटक्यात कळला.
  त्याने तिला भेटायचा संदेशा पाठवला…
  यू सुखा हैं ए-जमी तेरा बसेरा क्यू?
  पूछु सवाल तुझसे,
  या बारिश बन जवाब में
  मैं खुद ही बरसू…

Earning 0 /
Newbie

Recent posts

#अव्यक्त_2

अव्यक्त भाग १

थोडी हिम्मत केली असती तर???