Avyakt Bhushanoffline

0.0 rating
0 out of 5
0 ratings
 • India, Jalgaon
 • 3

  Posts

 • 0

  Comments

 • 214

  Views

 • Avyakt Bhushan 3 weeks, 2 days ago

  डिसेंबर की जानेवारी?
  तसा डिसेंबर त्याच्यासाठी कधीच खास नव्हता. डिसेंबर काही ना काही त्याच्याकडून घेऊनच जायचा. लहान असतांना ह्याच महिन्यात वडील गेले. खूप कष्ट करून आईने घर परत रुळावर आणलं. नोकरीला लागेल तोवर ह्याच महिन्यात आई गेली. कॉलेजला असतांना त्याला एक मुलगी आवडायची. 4 वर्षाचं नातं तिने एका झटक्यात तोडलं! तेही ह्याच महिन्यात.

  नोकरीला लागला. तेव्हा एक मुलगी परत आयुष्यात आली. तिचं आणि त्याचं तसं खास जुळत नव्हतं. ते नेहमी विरूद्धच बोलायचे. हो पण नेहमी बोलतच असायचे. तिचे स्वप्न फार मोठे होते. त्यात हा कुठेच बसत नव्हता. पण तिच्यात ह्याचा जीव फार अडकलेला. तिला खूप मोठं व्हायचं होतं. पण एकटीने नाही. तिला तिचा पार्टनर ही तसाच पाहिजे होता. म्हणून तिने ही ह्याला goodbye केले, योगायोगाने ह्याच महिन्यात!

  तो नेहमी डिसेंबर महिन्यातच काही ना काही गमवायचा. आता तर त्याला त्या गोष्टीची जाणीव झाली की ह्याच महिन्यात आपल्याला काही ना काही कारणाने काही ना काही सोडावं लागतं. पण तो थांबला कधीच नाही. जे काम आवडत होतं ते करतच राहिला. कधीच डगमगला नाही.
  डिसेंबर ही थकला होता वाटतं त्याच्याकडून घेता घेता. वर्षे लोटली आता त्याच्या आयुष्यात कुणीच नव्हतं उरलेलं.

  प्राजक्ता! जीचं त्याच्याशी जमत नव्हतं पण प्रेम होतं. तिला त्या प्रेमाची जाणीव खूप उशिरा झाली. सगळं गुंडाळून ती त्याच्याकडे तातडीने आली. भेटली. आणि तिने त्याला विचारलं,”जे करायचं ते करू! जिथे असू तिथे असू! पण आपण आयुष्यभर सोबतच राहू! राहशील ना सोबत माझ्या?”
  बेशक मैने कमाया बहौत कुछ हैं,
  मगर जो तुझे खोया तो जिंदगी में कुछ पाया ही नहीं…
  अशी तिची अवस्था झालेली. तिला त्याच्या शिवाय कुणातच कधीच इंटरेस्ट आला नाही. त्यालाही तीच्यानंतर दुसरी आवडली नव्हती. तो अजुनही तिथच होता जिथे ती सोडून गेलेली.
  आणि जेव्हा ती आली तो महिना जानेवारी होता.
  त्याला थोडं हसू आलं आणि मनातल्या मनात तो म्हणाला,

Earning 0 /
Newbie

Recent posts

#अव्यक्त_2

अव्यक्त भाग १

थोडी हिम्मत केली असती तर???