Avyakt Bhushanoffline

0.0 rating
0 out of 5
0 ratings
 • India, Jalgaon
 • 3

  Posts

 • 0

  Comments

 • 213

  Views

 • Avyakt Bhushan 3 weeks, 2 days ago

  #अव्यक्त_२
  गेल्या सोमवार पासून खूप आतुरतेने पुरवणीची, त्याच्या लेखाची आणि खरतर त्याच्या उत्तराची वाट ती बघत होती.
  पुढचा रविवार आला. सकाळी लवकर लवकर सगळं आवरून ती पेपरची वाट बघू लागली.
  लांबुनच पेपरवाला येतांना दिसला.
  पटकन गेटकडे आली.
  पेपर पडला.
  लगेच उचलला.
  पुरवणी शोधली.
  बाकीचा पेपर तिथेच टाकला.
  पळतच मागच्या दारात गेली.
  मधलं पान घेतलं.
  त्याचा लेख वाचला.
  वाचतांना एक कसलीतरी शोधाशोध सुरु होती.
  शेवटी एक शेर होता
  “यू सुखा हैं ए-जमी तेरा बसेरा क्यू?
  पूछु सवाल तुझसे,
  या बारिश बन जवाब में,
  मैं खुद ही बरसू…”
  तो वाचताच,
  “चार महिने उन्हात तापलेल्या,
  आणि जून मध्ये आभाळ दाटून आल्यावर ,
  जमिनीच्या डोळ्यांना जशी “पहिला पाऊस बरसणार” ही आस लागत असेल…..तसच….
  अगदी तसच तिचं त्या क्षणाला झालं.
  जवळच्या दरवाज्याला टेकत तिने ती पुरवणी ओंजळीत गोळा करून हृदयाच्या कवटाळून घेतली.
  त्या क्षणाला तिने जणू पुरवणीलाच नव्हे तर त्यालाच मिठी मारली.
  नकळत तिच्या डोळ्यांतही आनंदाचे मेघ दाटून आले. त्या आनंदाश्रुंची पहिली सर अलगद तिच्या गालावरून ओघळून त्या पुरवणी वर बरसली.
  तिने तो प्रेमाचा पहिला क्षण पूर्ण जगून घेतला. पेन उचलला तिचा अभिप्राय….(ummmmm अभिप्राय?
  नाही आता ह्याला आपण शुद्ध प्रेमपत्रच म्हणुया का?) लिहायला घेतला,
  पहिल्या भेटीचा येवा धाडला,
  “सारस बाग. पुढच्या सोमवारी. संध्याकाळी ४ वाजेला. मी वाट बघतेय” त्यासोबत एक पेनसुध्दा कुरियर केला.
  ह्यावेळचा तो शेर तोडका मोडका नाही तर तहे दिल से लिहिला,
  “पहली बार कर रही हू इक ख्वाहिश तुझसे ए-जिंदगी ,
  हो सके तो पहली चाहत को मेरी
  तू मुझसे जरूर मिलाना…”
  त्याने पुढचाच लेख “भेटण्यासाठी ७० च्या दशकातल्या एका कपल ने काय काय केलं” ह्या विषयावर लिहिला.
  त्याखाली तिच्यासाठी आणि तिला कळतील अश्या सुंदर दोन ओळी लिहिल्या…
  “निमित्तमात्र लागतं माणसाला प्रेम व्यक्त करायला,
  ह्या भेटवस्तू फक्त बहाणा बनून येतात…”
  🖤
  ——-
  (अभिप्राय नक्की कळवा. चुका सुधारता येतील.)
  (फोटोस्रोत Google)
  पुढची पोस्ट “त्या अव्यक्त भेटीची…”

Earning 0 /
Newbie

Recent posts

#अव्यक्त_2

अव्यक्त भाग १

थोडी हिम्मत केली असती तर???