Avyakt Bhushanoffline

0.0 rating
0 out of 5
0 ratings
 • India, Jalgaon
 • 3

  Posts

 • 0

  Comments

 • 201

  Views

 • Avyakt Bhushan 2 weeks, 1 day ago

  मजबूत थंडीचे दिवस होते. प्रदिपला घरी जातांना रस्त्याने एक छोटसं कुत्र दिसलं. ते त्याच्या मागे मागे येत होतं. प्रदीपला थोडं हसू आलं की हे माझ्याच मागे का येतय? नंतर तो त्याला हाकलून लावत होता पण ते त्याच्या मागे मागेच यायला लागलेलं. रात्रीचे १२ वाजून गेलेले. कधी नाही ते आज तो बाहेर एवढा वेळ थांबलेला. आणि आत्ताच हे छोटं पिल्लू त्याच्या मागे मागे.

  प्रदीपला त्या पिल्लाचं ते मागे येणं आवडून गेलं. ते कुत्र एकदम लहान असल्याने मोठी कुत्री त्याच्या मागेही लागलेली. पण प्रदीप सोबत असल्याने जवळ येईन निघून जायची. आताशा त्या लहानग्याला कळलं की ह्याच्या सोबत असलो तर आपल्याला बाकीचे त्रास देणार नाहीत. मग ते त्याच्या मागे मागे आणि तो त्या पिल्लाला मागे मागे करत घरी घेऊन आला.

  घरी आल्यावर त्या पिल्लुला बघून घरचे सगळे खुश होतात. पण त्याची “सू, शी” कोण करणार?
  प्रदीप तुलाच करावं लागेल बरं का सगळं. हो हो करेल मी! बाहेरून आलेल्या त्या पिल्लाला तो घराच्या पोर्च मध्ये (बाहेर) एका पोत्यावर बसवतो. पण ते काही केल्या त्यावर बसत नाही.
  मग तो त्याला उचलून त्यावर बसवतो. पिल्लाला जरा बरं वाटतं मग ते त्यावर बसतं. पण त्याचा आवाज आणि त्याची कुणकुण काही बंद होत नाही. थोड्या वेळात ते जरा शांत होतं.

  घरचे सगळे घरात जातात. सगळे घरात गेल्यावर काही वेळाने ते पिल्लू परत आवाज करतं. घरचे म्हणतात कशाला रे घेऊन आलास त्याला घरात? रात्रभर झोप मोडेल तो.
  “मोडून देत! एक दिवस नाही झोपलात तर काय फरक पडणार आहे का?” प्रदीप रागात बोलतो.

  मग त्याला आठवतं त्याचा एक मित्र कुत्र्यांना दूध पाजत असतो. तो थोडं दूध घेतो पाणी घालतो त्यात आणि पिल्लाला देतो. ते पटापट दूध पिऊन घेतं. आणि पटकन जाऊन त्या पोत्यावर जाऊन बसतं. आता कुठे प्रदीपला बरं वाटून येतं. रात्रीचे २ वाजलेले.
  तो घरात परत येतो. पण घरात आल्यावर थोड्या वेळाने परत ते आवाज करतं. आता मात्र घरातले वैतागतात. तू ते पिल्लू लांब सोडून ये बरं प्रदीप! एकतर खूप उशीर झाला आहे आणि त्याने आमच्या झोपेचा खोळंबा करून ठेवलाय. तू प्लीज त्याला घेऊन जा.

  तो भरल्या मनाने त्याला लांब सोडून येतो. पण ते काही तिथे थांबत नाही. काही वेळाने परत त्याच्या गेट जवळ येतं. आता तर प्रदीपला ही राग येतो की हे पिल्लू जात का नाही. पण त्याचं मन ही त्या पिल्लाला सोडू देत नाही. तरी तो त्याला गुंडाळतो आणि घराच्या पाठीमागे सोडून येतो.
  आता तो मनातल्या मनात विचारच करत असतो की आता ते पिल्लू काही केल्या येणार नाही. घराच्यांची झोपही उडणार नाही. रात्रीचे साडे ३ झालेत.
  तेवढ्यात ते पिल्लू परत गेटजवळ…

  आता मात्र तो त्याला असा काही गुंडळतो की त्याला काही दिसणार नाही आणि लांब एका ठिकाणी सोडून येतो. त्या पिल्लाला सोडतांना पिल्लाच्या अंगात थंडीने थरकं भरलेलं प्रदीपला जाणवतं. पण त्याला त्याच्या घरच्यांची झोप उडू द्यायची नसते. म्हणून तो भरल्या मनाने का होईना त्याला सोडून देतो पण ह्यावेळी परत बघत नाही. आणि ते पिल्लू येत ही नाही.

  असच होतं आयुष्यात. आयुष्याच्या काही वळणावर नकळत काही नाती जोडली जातात. मित्र मैत्रिणी सखा साजनी, अजुन खुप सारी. सगळं अगदी काही कळायच्या आत होतं. आपुलकी वाटते त्या माणसाबद्दल त्या नात्याबद्दल. पण आपली जुनी नाती त्या नव्या नात्याला, त्या नवीन माणसाला, आपल्या त्याच्याप्रती असलेल्या भावनेला त्या त्या वेळेला स्वीकार करतीलच असं नाही. मग त्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण त्या नवीन नात्याला लांब सोडण्याचा प्रयत्न करतो. एकदा दोनदा सोडवत नाहीच हो, अर्थात त्या नवीन नात्यासाठी जुनी नाती उगाच धारेवर धरत सुद्धा नाहीच.
  पण….

  पण त्या नवीन नात्यात जीव अडकला जातो त्याचं काय?
  आयुष्यभर त्यासारखे नवीन नाते आजू बाजू दिसले की मनात एक खंत राहून जाते. त्या दिवशी मी त्या नात्याला सोडून नव्हतं द्यायचं.
  काय झालं असतं फार फार? जुन्या नात्यांशी मला भांडाव लागलं असतं ? बस एवढच ना?
  भांडलो असतो मी. भांडेन मी. करेन स्वीकार नवीन नात्यांचा. हो आणि जूनेही सोडणार नाही.
  हो त्रासतात ते थोडे दिवस, पण काही काळानंतर येतात ना जागेवर. त्यांना ह्या गोष्टीची खंत आयुष्यभरासाठी तर नसेल ना. ऐकतात ते आपलं. का नाही ऐकणार? त्यांचं प्रेम नसतं का आपल्यावर?
  आणि नाहीच ऐकलं तर?
  गमावून बसायची का आपण आपली एवढे वर्ष बहरलेली सगळी जुनी नाती त्या नवीन नात्याला फुलवायला?
  तर… करायचा कधीतरी हा ही प्रयत्न. फुलवायची आहेच ना कधी ना कधी नवीन नवीन नाती. मग ते कधी आणि कुणासोबत फुलवायचं ते स्वातंत्र्य आपल्याला असावं.

  त्या जुन्या नात्यांमुळेही कधी कधी न आवडणाऱ्या गोष्टी केल्याच ना मी. मग त्यांनी एकदातरी मला ही संधी का नको द्यावी? का मी ह्या वेळेला मागे हटावं? त्यांचा तो हट्ट आणि माझं ते काय?
  काय झालं असेल त्या पिल्लुचं त्या मरणाच्या थंडीत?
  कुणीतरी दुसऱ्याने आसरा दिलाच असेल ना? काही लोकं कशी इतकी चांगली असतात आणि मी का असा मग?
  नाही नाही नाही…
  मी आताच निवडणार मला काय हवं ते…
  नाहीतर आयुष्यभर रोज रोज तेच ते ओझं घेऊन जगायला मला आवडणार नाही. जमणार ही नाही. करतील थोडे दिवस ते adjust. होतील माझ्या नवीन नात्याशी सलंग्न. त्यांना वाटतोय व्यवहार तर होईल सारा व्यवहार बरोबर…
  घेईन मी काळजी माझ्या त्या नात्याची. नाही होऊ देणार त्रास त्यांना. करेन मी सगळं माझ्या पद्धतीने बरोबर.
  I will get my happiness on my own!

  “मैं सोचता रहा हुं उनके ही बारे
  जो खुद ही से रिश्ता निभा ना सके,
  मैं क्यू सोचू मुझे नफ्रत हैं अब उनसे,
  जो लोग सिर्फ औरो से उम्मीदें हजार कर चुके…”

Earning 0 /
Newbie

Recent posts

#अव्यक्त_2

अव्यक्त भाग १

थोडी हिम्मत केली असती तर???