Janhavi Petheoffline

0.0 rating
0 out of 5
0 ratings
  • 4

   Posts

  • 0

   Comments

  • 321

   Views

  • Janhavi Pethe 1 week, 6 days ago

   तू निरागस चंद्रमा

   चंद्राच्या शीतल प्रकाशात न्हाऊन निघालेल्या चांदणीसारखी माझी बछडी लोभस दिसत होती..

   निरागस….

   लहान मुलं असतातच निरागस…

   आणि झोपल्यावर तर अजूनच दिसतातच..

   दिवसभराची बडबड,चिडचिड ,खेळ,रडारड याचा मागमूसही नसतो चेहऱ्यावर…

   दिवसभर तुझ्याकडे शांतपणे बघायला होतंच नाही ग..असतेसच कुठे एका जागी स्थिर…

   पायाला तर जणू चक्रचं लावलेलं असतं.

   हे इवलुसे पाय दुखत असतील ना?ते चेपताना तुझ्या प्रेमाने छाती उगीचच दाटून आल्यासारखी झालेय.

   तुझं बालपण मनात, डोळ्यात साठवून ठेवावं वाटतं..

   चिमुकल्या हातानी भरवलेला घास….

   स्वर्गसुखच ..

   गोबऱ्या गालांवर राग पण मोठा असतो तुझ्या..

   कितीही रागवायचे ठरवूनसुद्धा रागवताच येत नाही तुझ्यावर..

   केंद्रबिंदू झालीस आयुष्याचा.

   पापा घ्यायचा नसतो झोपलेल्या बाळाचा..पण आईच्या प्रेमाला सगळं माफ हो ना?

  Earning 62 /
  Newbie

  Recent posts