No means नाहीच… याची सवय मुलांना लावाचं

Written by

       मुलांना “No means नाहीच”.. याची सवय लावा
✍️©जयश्री कन्हेरे -सातपुते

आज प्रेरणा खरेदीला बाहेर पडली.साहजिकच मुलगी सोबतच होती. गरजेच्या सर्व वस्तू घेतल्यानंतर, बाहेर निघणार तेच अनुश्री आणि तिची आई टॉय शॉप मधे दिसल्या.. अनुश्री म्हणजे रियाची  क्लासमेट. तिच्या आईसोबत चांगलीच ओळख होती, म्हणून प्रेरणा बोलायला गेली. कुणासाठी तरी गिफ्ट घ्यायचं होतं त्यांना म्हणून आल्या होत्या.. त्या गिफ्ट सोबतच अनुश्रीने Barbie सेट स्वतःसाठी घेतला… अर्थातच आपण पालक नाही म्हणतच नाही मुलांना.. तिचा Barbie सेट बघून रियाने प्रेरणा कडे Barbie सेटची मागणी केली.
“अग घरी 3 सेट आहेत न बेटा, मग आता कशाला पुन्हा नवीन barbie  सेट “..प्रेरणा (समजवण्यासाठी )

“आमच्या अनुश्रीकडे तर 5 आहे, आज तिला हा आवडला तर म्हंटल घेऊन घे,त्यात काय आहे “…अनुश्रीची आई. (थोडक्यात श्रीमंतीचं प्रदर्शन )

मग रियाचं झालं सुरु, “अनु कडे 5 Barbie  सेट आहे तरी तिची आई तिला घेऊन देतेय. माझ्या कडे तर तीनच आहेत तरी तू मला नाही म्हणतेस. ???”

   कुठे खेळतात का ही मुलं इतकी खेळणी. फक्त विकत घ्यायची नवीन असल की दोन दिवस खेळतात मग तसेच पडून तर असतात.पुन्हा कधी दुकानात गेलं की. हे पाहिजे ते पाहिजे सुरु… प्रेरणा( थोडं अनुच्या आईला  समजवण्याच्या प्रयत्नात)

   नाही म्हणाले की किती गोंधळ घालतात, आणि आहेत न पैसे आपल्या कडे मग मुलांच्या इच्छा नको का पूर्ण करायला.? आता मी अनुश्रीला Barbie सेट घेऊन दिला नसता न तर तिनी अख्खा मॉल डोक्यावर घेतला असता.. आणि घरी जाऊन तिच्या बाबांन जवळ तक्रार पण केली असती. तिचे बाबा म्हणतात “माझ्या बच्चाला जे पाहिजे ते घेऊन देत जा. तिच्यासाठीच तर करतोय न इतकं काम मी. मग तिच्या कोणत्याच गोष्टीला नाही म्हणायचं नाही ” आता त्यांनीच परमिशन दिल्यावर आपण तरी काय करणार नाही का… अनुश्रीची आई (आपल्या मुलीवर किती प्रेम आहे आणि तिच्यासाठी काही कमी नाही हे सांगण्याच्या अविर्भावात )

(आता जर रियाला घेऊन दिल नाही तर अनुच्या आईला वाटेल किती कंजूस आहे किंवा यांच्याजवळ पैसे नसेल घ्यायला..या विचारात प्रेरणा होती. प्रेरणा तिच्या विचारावर ठाम होती “नाही घेऊन द्यायचं म्हणजे नाहीच ” ) (©जयश्री )

  मग प्रेरणा झाली सुरु अनुच्या आईची कानउघाडणी करायला …..   आपल्या या अतीलाडाने मुलं बिघडत चाललीय, वस्तूंची गरज नसतानाही त्यांना त्या मिळत आहे. त्यामुळे वस्तूंची किंमत कमी होतें त्यांच्या नजरेतून. “सर्व गोष्टी मला मिळतीलच.” “माझे बाबा मला कधी कशासाठी नाही म्हणतं नाहीच.” अशा मुलांना नाही हा शब्द ऐकण्याची सवय नसते.घरचे ठीक आहे हो.. “गोंधळ नको घालायला, रडायला नको”, “तिच्यासाठीच तर कमावतोय.” या सर्व गोष्टी घराच्या आत.. पण जेंव्हा ही मुलं घराच्या चार भिंती बाहेर जगात वावरतात आणि त्यांना “नाही ” हा शब्द एकावा लागतो तेंव्हा ही मुलं खचुन जातात. नकार पचवण्याची शक्तीच नसते त्यांच्यात. या नकाराचे दुष्परिणाम आपण न्यूजपेपर मधे वाचतो, टीव्हीवर बघतो. 

         आपल काय असते “मुलं लहान आहेत त्यांची हौसमौज आपण पूर्ण नाही करणार तर कोण करेल.. ” मान्य आहे मला. हौसमौज पूर्ण नक्की करा.जे खरंच गरजेचं आहे ते घेऊनही द्या. पण “घरी 5 Barbie सेट असल्यावर पुन्हा एक कशाला हवा?” याच उत्तर मागा मुलांना. अशा प्रश्नांमधून त्यांना याच लहान वयात काय आवश्यक व काय अनावश्यक आहे याची निवड करायला शिकवा. ते रडतील, रागावतील किती दिवस, एकदाची त्यांना वस्तूंची गरज कळली की ते मागणार नाही. त्यासाठी आपल्याला आधी “नाही घेऊन देणार ” No means नाहीच ” याची सवय करायला हवी.

 (इतकं बोलून प्रेरणाने रिया कडे मोर्चा वळवला…. ) प्रेरणा रिया ला म्हणाली,बेटा तुझ्या कडे आहेत व आता तुला घेऊन देणार नाही, तुला बाहेर मी काही मुलं दाखवली ज्यांना नीट कपडे पण नव्हते घालायला ते तुझ्याच वयाचे होतें न. त्यांना मिळतात का अशी खेळणी? 

 “नाही “..रिया

मग आपल्या कडे असल्यावरही आपण दुसरं का घ्यायाचं व पैसे विनाकारण का खर्च करायचे? 

“ठीक आहे आई “…रिया

 शहाणं माझं बाळ. आईने एकदा no म्हंटल की त्यांचा अर्थ काय..?

No means No  “…रिया ?

Good girl..

तुमची रिया ऐकते हो.. अनुची आई 

   हो, तर का नाही ऐकणार मुलं रडतील, हट्ट करतील म्हणून सर्व ते म्हणतात तस करणारी आई नाही मी. मी आधीच “नाही म्हणण्याच्या कलेत नैपुण्य मिळवलय “ मला माझ्या रियाला परिस्थिती कशीही असो तिचा सामना करण्यासाठी, चांगलं -वाईट, आवश्यक -अनावश्यक या गोष्टीसाठी तयार करायचं आहे. आपल्या या फाजील लाडामुळे मुलं कमकुवत बनत चाललीय. मला सगळं मिळत व मिळालंच पाहिजे यासाठी मग ते कोणत्याही स्तरावर जातात. आता आपली मुलं लहान आहेत मान्य आहे.. हेच वय आहे त्यांना या गोष्टी शिकवण्याचं. सगळंच आपल्याला मिळू शकत नाही.. काही गोष्टी मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते हे सांगण्याच. मी तर तसंच करते. “नाही म्हणजे नाहीच” इतकं बोलून प्रेरणा व रिया दुकानातून निघून गेल्या Barbie  सेट न घेता

अनुची आई गप्पच झाली.. ??

समाप्त… ?©जयश्री कन्हेरे -सातपुते

       प्रेरणाने विचार नाही केला की ती सगळ्यांन समोर रियाला घेऊन देणार नाही तर त्यात तिचं स्टॅंडर्ड डाऊन होईल. गरीब समजलं जाईल, कंजूस समजलं जाईल.  या स्टॅंडर्ड च्या नावावर आपण आपली मुल बिघडव तर नाही न…?

किती सहज आपण म्हणतो न…”आजकालची पिढी खूपच हट्टी आहे. नाही तर एकूच शकत नाही ही मुलं.इतका राग येतो यांना नाही हा शब्द जरा जरी कानावर पडला तर.. आणि त्यानंरच चित्र तर विचारूच नका.. “

   आपले आई -बाबा आठवा…(माझे तरी ) एकदा नाही म्हंटल की मग तू लोटांगण घाल नाहीतर नागीण डान्स कर.. मिळणार नाही म्हणजे नाही. त्या नाहीची जखम अजून पर्यत असते आपल्या मनात म्हणून आपण आपल्या मुलांना नाही म्हणतं नाही. त्यांचा परिणाम ते हट्टी होतं आहेत. यात पालकांचाच मोठा हात आहे बर का…

आपल्या आई -बाबांना नाही म्हणणं किती सोपं जायचं. तेंव्हा जरा पैशाची अडचण असायची त्यामुळे त्यांची इच्छा असूनही ते नाही म्हणायचे. तेंव्हा मला खुप राग यायचा. त्यांचा फायदा मला आज कळतोय.. त्यामुळेच no means  नाहीच.. हे मी पण माझ्या मुलीला सांगते.?©जयश्री कन्हेरे -सातपुते 
कशी वाटली कथा… तुमच्या परिचयातीलच तर like, कमेंट करायला विसरू नका… शेअर करायचा असेल तर नावासहित शेअर करायला हरकत नाही..धन्यवाद ???

Article Categories:
सामाजिक

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत