One night stand !!

Written by

” one night stand ”

©️ सौ . योगिता विजय टवलारे✍️

सगळे जण सगळ्या गोष्टी करतात म्हणून आपणही तसचं करायला हवं असं काही नसतं..एखादी कृती केल्यावर आपण स्वतः ला आरशात बघू शकतो, स्वतः ला चेहरा दाखवू शकतो..ह्याची खात्री असेल तर मग ती गोष्ट बिनधास्त करावी ..नाहीतर नाही..

मनात येईल ते करणारी मी..जग माझ्याबद्दल काय विचार करत ? लोक मला काय बोलतील? हा प्रश्न मुळातच माझ्या मनात कधी आला नाही..कारण मला माझं हित कळत..मी माझ्या बरोबर कुठलीही वाईट गोष्ट होऊ देणार नाही..मला माझ्या मर्यादा पाळायच्या आहेत..आपण एखादी गोष्ट करतो , त्यावेळी ती योग्य की अयोग्य हे कळण्याईतपत आपण शुध्दीवर असायलाच हवं…

मी मनाशीच ठरविलं ,जे मनात आहे ,जे आजूबाजूला घडतं ते स्पष्ट भाषेत लिहायचं! त्यासाठी गरजेचं नाही जी गोष्ट मला पटेल ती इतरांना पटलीचं पाहिजे कींवा मग जे इतरांना पटतं ते मला पटलच पाहिजे..कारण प्रत्येकाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, विचार करण्याची पद्धती वेगळी असते..जग बदलतंय , नाती – नात्यांची अर्थही बदलायला लागलीय.. love, emotions, loyalty ह्या सर्वांना मागे टाकून समोर आलाय ते ‘one night stand’ …

कुणाच्या प्रेमात गुरफटून न जाता फक्त एक दिवसाची ओळख ठेऊन कुठल्याही परिणामांचा विचार न करता स्वतः ला समर्पित करणं म्हणजे…ज्यांना ही बाब फार साधी सोपी वाटत असेल तर त्यांच्यासाठी म्हणावं लागेल ..जे one night stand च्या आहारी गेलेत त्यांची अगदी जवळची व्यक्ती अशीच वागली तर….

ब्रेक अप नंतर जर कुणी ‘ one night stand ‘ सारखा मार्ग निवडत असेल तर खरंच ते प्रेम विसरू शकतात का? एकदा तरी हा प्रश्न स्वतः च्या मनाला विचारुन पहा .. किंवा मग एखादा मित्र/ मैत्रीण म्हणतो म्हणून ‘ चान्स’ घ्यायला काय हरकत आहे? असं बऱ्याच प्रमाणात होत ना? बरोबर ना? कुणीतरी आपल्याला suggestion देत मग आपण ते चुकीचे की बरोबर ह्याचा विचार न करता ‘ चान्स ‘ घेऊन पाहतो ..

मग होत काय? एकदा का चिखलात पाय पडला की तो आणखी घसरायला लागतो ..त्यापेक्षा आधीच सावरलेल बरं! कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे फक्त आपल्याच हातात असतं ,बरोबर ना? काहीतरी वेगळं ,भन्नाट करण्याच्या नादात स्वतः च अस्तित्व , ओळख गमवायला नको..

” फिजिकल रिलेशन ठेवण्यासाठी लग्न केलंच पाहिजे असं काही नसतं.. ” असे ज्यांना वाटते , मला तरी त्यांच्यात आणि प्राण्यांमध्ये काहीच फरक जाणवणार नाही..कारण प्राण्यांचेच अनेकांशी संबंध असतात..

#सॉरी , मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीयेत..? पण , मला जे पटत नाही ते सहजच बोलून जाते.. आताच अशी परिस्थिती आहे , तर पुढच्या पिढीचा विचार करता कुटुंब म्हणजे काय? माया,आपुलकी,प्रेम काय असत? हे सुध्दा कळणार नाही..

माणसाने प्रॅक्टिकल असायलाच हवं ; पण त्याचं मन अगदीच दगड नको..भावना, प्रेमासाठी त्याचा मनात थोडीतरी जागा असायला हवी..मला फक्त एवढंच म्हणायचंय पुढच्या पिढीसाठी आपली प्रतिमा शुद्ध ,स्वच्छ,निर्मळ असावी..

त्यांनी आपल्यापासून खूप शिकायला हवं..कारण आपण जसं असू तशीच आपली पुढची पिढी असेल..भविष्यात असे व्हायला नको ,आपल्याला नातू तर आहे पण आपल्या मुलाची नेमकी बायको कोण? किंवा आपल्या मुलीचा नवरा कोण ? हेच कळायला मार्ग उरणार नाही..कुणाशीही फीजिकल रिलेशन ठेवल्याने हाच प्रश्न उद्भवणार ना? लग्न न करता मुलांना जन्म दिल्यावर हीच परिस्थिती राहिलं ना? मग मला सांगा, तुम्हाला आवडेल तुमची मुलं / मुली अशी भरकटलेली पाहताना? नाही ना? मग सर्वात आधी तुम्हाला स्वतः ला बदलाव लागेल..’ one night stand ‘ सारख्या मूर्खपणाला वावं द्यायला नको..

तुम्ही जर संसार किंवा रीलेशनध्ये असाल तर आपल्या जोडीदाराबरोबर तेवढंच विश्वासाने राहणे आवश्यक आहे..

माझ्या विचारांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून सॉरी!?जर माझ्या ह्याच विचारांमुळे कुणाच्या आयुष्यात चांगला बदल झाला तर मला आनंदच होईल….

शुभांगी भडभडे ह्यांच्या ‘ सुमित्रा ‘ कादंबरी मधल एक वाक्य लिहावस वाटतं – ” आपलं जीवन आरस्पानी असावं..इतकं सुंदर की वार्धक्याला मागे वळून बघताना किंवा कुणाला सांगताना स्वतः च्या मनाला खोटं बोलावं लागणार नाही” ….??

मग करायची ना नव्या, सुंदर आयुष्याला सुरुवात??

#लेख पुण्यनगरी ला पूर्वप्रकाशित !!

#लेख आवडल्यास शेअर करा ,पण एका अटीवरच , फक्त माझ्या नावासकट ! नाही आवडला तरीही सांगा , ते पण सौम्य भाषेत.. ??

(असे तुमच्या आजूबाजूला घडतंय का? घडत असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा..☺️)

♥️ योगिता विजय ♥️

१८ / ८ /१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा