Relationship…. ते….लग्न

Written by

Relationship …….लग्न

“अग,पण तुला हो म्हणायला काय हरकतआहे?मुलगा छान आहे ग.तुझा आगाऊपणा नको ग आड आणू”मी अगदी मनापासून बोलत होती.अनन्या नुसती हो हो करत पोहे संपवत होती. ” अग तु जशी आहेस तशी आवडते त्याला. अजुन काय हवे?आता अठ्ठावीस पुर्ण होईल तुलाही. ”
” हे बघ आई तुला पटतय न त्याला मी आवडते.मग राहु दे न मला त्याच्या बरोबर .फक्त तुझी हरकत आहे. “अनन्या
” अग पण लग्न न करता “मी
“तुझ Love marriage करून काय झाल.दोन वर्षांनी प्रेम संपल आणि तुला माझी जबाबदारी देऊन ते नामानिरळे झाले.त्या पेक्षा हे बर न no commitment no expectations. उद्या नाहीच पटल तर मार्ग मोकळा दोघांनाही. “इति अनु.
“अग पण अनिश नाही वाटत तसा.माणुस जोडुन ठेवण्याची कला आहे त्याला. नाहीतर तु वा- याशी पण भांडणारी.त्याचीच काळजी वाटते मला ” मी
मला लख्ख आठवत होतं सारे काही. कारण त्या रात्री अनिश घरी आला होता ती नसतांना. दोघ खुप वेळ बोलत होतो. तिला माणुस म्हणुन तो अगदी योग्य आहे हे परत एकदा जाणवल.मी अनुला होकार दिला. आता या गोष्टीला आठ वर्ष होत आली. आज अनन्या आणि अनिश लग्न होत.
मधल्या आठ वर्षांच्या काळात बरच काही झाल होत. दोघही करिअर मध्ये adjust झाले होते. शेजारी शेजारी दोघांनी जागा घेतली होती आणि EMI ही अनन्या सांगण्यावरून separate जात होते. त्याने घरी काय सांगितल होत माहित नाही .मी त्याला सुचवलही होत की मी तुझ्या घरी येऊन बोलते पण तो नाही म्हणाला होता. पण ते भेटले तरी सगळ ok असायच.
सुरुवातीला अनन्याचे अनेक मित्रमैत्रिणी त्याच्या घरी यायचे उगाच Timepass करत बसायचे.तिच हे वागण त्याला खटकायच पण कधीच मला बोलला नाही आणि कधी मलाही बोलु दिल नाही. महिन्यातुन एकदा तिला माझ्या कडे फोन करून जेवायला घेऊन येतो आणि येतांना माझ्या आवडत्या आळुवडया घेऊन येतो. पहिल्या दिवाळीत त्याने तिला त्याच्या घरी साता-याला न्यायचा plan केला होता. हिने त्याला न विचारता तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर केरळ plan केल.माझ आणि तिच खूप वाजल होत.तो ठरल्या प्रमाणे निघून गेला आणि ही पण.
पुढच्या दिवाळीत मात्र त्याने तिला विचारलंच नाही तो सुट्टी घेऊन साता-या ला निघून गेला आणि या वेळी मी पण तिला बोलावलंच नाही. जरा माझ्यापाशी बडबड करायला लागली तर मीच तिचा फंडा तिला ऐकवला No Commitment No expectations. मग तोंड पाडुन बसली होती. असे अनेकदा होत होतच.
ती गाडीवरुन पडली पायाला फॅक्चर झाल त्याच दिवशी नेमका त्याचा promotion चा interview होता. त्याने मला फोन केला होता आजचा एक दिवस सांभाळा मग मी रजा टाकतो. रजा टाकली होती नंतर त्याने तर हिची धुसफुस चालुच. त्याला लगेच नाही का येता आल.मी बोलले “तु काय आज आहे उद्या नाही. त्याला त्याचही आयुष्य आहेच ना.तु काय ते relationship आहे ना.मग कशाला अपेक्षा “माझ बोलण तिला चांगलच लागल होत.
मध्यंतरी त्याच्या बाबांना attack आला. घरून फोन आला तसा हिला फोन करून ती घरी यायच्या आत तो निघून गेला. ” आई मी नसते का गेले सोबत. एकटा काय काय बघेल. मला सांगयच तर खर.मी गेले असते आई” ती अगदी मनापासून बोलत होती. मग मीच बोलले “अग आमंत्रण कशाला हवं.तू त्याची चांगली मैत्रीण आहेस ना.” ती खरच गेली आणि महिनाभर राहिली पण येतांना त्यांना घेऊन पण आली.
मागच्या आठवड्यात तिचा अचानक फोन आला ” रात्री राहायला येते.थोड बोलायचं होत.”
माझ BP दिवसभर वाढलेल.
रात्री उशिरा आली.जेवायला बसलो तशी हळूच म्हणाली “आई, मी लग्न करायच ठरवलं आहे अनिशशी.” माझा घास हातातच राहिला…………….
“इतकया वर्षांनी ही उपरती का आता?का तो तुला सोडुन जाऊ नये म्हणून हा घाट.”मी
“अग तस नाही पण मलाही इतक मोकळेपण नको होत ग.कुणी तरी थांब म्हणावं अस वाटत. कुणी तरी माझी पण वाट बघावी. मला हक्काने काहीतरी करायला सांगव.मी महिनाभर तिकडे होते.मला त्याच्या आईबाबा बरोबर राहुन अनेक गोष्टी लक्षात आल्या.माणुस आवडत असेल तर जस आहे तस accept करायला हव.थोड compromise करायला हव.मी सगळ तुला आलेल्या अनुभवावरच ठरवत होते. ”
त्या रात्री मला अगदी शांत झोप लागली. आता ती खरी शहाणी झाली होती.

प्रज्ञा बापट

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा