Replacement

Written by

“इथं मिसळ खूप छान मिळते”

मी पहिला घास खाल्ल्यावरच म्हणालो. तिने काहीच प्रतिक्रिया नाही दिली.

नुसतीच हसली, पण हे हसणं वेगळंच होतं,

छान दिसते ती हसल्यावर…

हातावर हात ठेवला तसा झटकन हात खाली घेतला आणि पर्स मध्ये काहीतरी शोधायला लागली,

ते पर्स मध्ये शोधणं हे निम्मीत्त होतं !

खरंतरं आजही सुंदर दिसतीये ती..

तिला स्वतःहून कधी मेकअप करण्याची आवडही नव्हती आणि कधी गरजही नव्हती !!

तिला मी आता तिच्या आयुष्यात नको होतो आणि ते सरळ दिसतही होतं,

भेटायला उशीरा येणं, माझे कॉल्स टाळणं.

हे सगळं तिला संपवायचं होतं पण मला न दुखावता.त्यामुळं ती काहीच स्पष्ट बोलत नव्हती,फक्त टाळत होती.

तिचा तो निर्विकार चेहरा मलाही नव्हता बघायचा.

“मला देखील गरज नाहीये आता तुझी”, हे मीच बोलणं आता गरजेचं होतं.

हे सगळं संपलं तरी त्याचं guilt तिच्या मनात राहू नये म्हणून माझा प्रयत्न होता.

आणि तेवढ्यात तिने पर्समधून एक रिंग काढून टेबलवर ठेवली आणि उठून गेली…

 

त्या टेबलवर ठेवलेल्या रिंगची जागा आता दुसऱ्याच रिंगने घेतलेली होती.

 

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा