Roll Number 21 (कृष्णा आमच्या घरातला…!)

Written by

Roll Number 21 (कृष्णा आमच्या घरातला…!)

दुपारच्या वेळी अर्चित शाळेतून आला , झटकन कपडे बदलून फ्रेश होऊन जेवायला बसला.

” अरे जरा सावकाश जेवण करावं , पोटात दुखेल नाहीतर.आज जरा लवकर आटपून घे मला जन्माष्टमीच्या पूजेची तयारी करायची आहे..”

” तर Roll number 21 चा वाढदिवस आला तर …अगं आई जेवतांना तू टीव्ही बघू देत नाहीस मग माझा Roll number 21 सुरु होऊन जातं ,आणि माझी पाच मिनटं तशीच जातात .आणि आज तर special एपिसोड असेल…”

” बरं बरं , जेवण कर आता …काय बघता तुम्ही आजकाल त्या टीव्हीवर कुणास ठाऊक …आमच्या वेळी फक्त मोजकेच कार्टून होते टीव्हीवर , ते सुद्धा फक्त रविवारी. आता काय तर हवे तितके चॅनेल आहे बघायला . ” आईची बडबड सुरु होती .

” झालं एकदाचं जेवण …आता मी टीव्ही बघणार…१० मिनिटं उशीरच झाला टीव्ही सुरु करायला.. माझा Roll Number 21 सूरु पण झाला बघ…” अर्चितचा आरडा ओरड सुरु झाला होता. हात धुवून रिमोट हातात घेत अर्चित म्हणाला..

” अरे काय आहे Roll Number 21..? ” वनिताने विचारले..

” आई तुला roll number 21 नाही माहिती…!? ”
आईला जशी जगातील खूप महत्वाची गोष्ट माहिती नाही असे काहीसे हावभाव अर्चितच्या चेहरऱ्यावर दिसले..

” अरे नाही माहिती …तूच सांग बघू कोण आहे Roll number 21?” आई त्याला आश्चर्य करीत म्हणाली.

“अगं एक कार्टून कॅरॅक्टर आहे बघ…” अर्चित पटकन बोलला.

” अरे मग असलं काय नाव त्याच roll number 21..?”
आईचा परत प्रश्न आला..

” आई तो कोणी साधा सुधा नाही. देवबाप्पाची प्रतिकृती आहे. खूप जादूगारी करतात ते… ”

” अच्छा… कोण आहे मग ते सांगशील का, त्याला roll number 21 का म्हणतात .?”

” हे कार्टून म्हणजे मथुरा इथे गुरुकुलमध्ये राहणाऱ्या मुलांचे आहे. तिथे त्यांचे शिक्षक आणि मुले सगळे सोबत राहतात. त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक कनिष्कसर Roll number 21 ला सतत कारण काढून त्रास देत असतात. आणि त्यांना सोबत म्हणून डॉक्टर जय त्यांना मदद करीत असतात. पण Roll number 21 त्यांना त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला सडेतोड उत्तर देतो. त्यांच्या जवळ खूप विविध दैवी शक्ती आहेत , पण त्याच्या उपयोग ते लोकांचे रक्षण करण्यासाठी आणि कनिष्क सरांना धडा शिकविण्यासाठी करतात.”

” ओsss.. फारच छान वाटतं तुझे हे Roll number 21 …”

“ऐक तर आई , ते शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे पाताळ लोकांतील राक्षस असतात. प्रत्येक वेळी एका नवीन राक्षसाला ते पृथ्वीवर Roll number 21 शी युद्ध करायला बोलावत असतात . पण Roll number 21 समोर कोणीच टिकू शकत नाही. ”

” अरे वा… मला एक सांग तुला ह्या कार्टूनमध्ये काय आवडतं . तुला ते परत परत का बघावस वाटतं..?”

” अगं Roll number 21 किती चतुर, हुशार आणि साहसी दाखविले आहे . त्याच्या मित्रांवर ते खूप प्रेम करतात . पिंकी, मधू ,बबलू, गोलू ,सुखी ,तारक , प्रशांत ,चिंपू असे त्यांचे अनेक मित्र आहेत . आणि सुपर्णा आणि बासू नावाचे दोन शिक्षक पण आहेत . जेव्हा कनिष्क सर त्यांना त्रास देतात तेव्हा Roll number 21 त्यांना वाचवायला जातो. समोर कितीही मोठं संकट आलं तरी जिद्दीने त्या संकटांना समोर जाण्याची शिकवण मी ह्या कार्टून मधून घेतो. ”

” इतकी सगळी त्यांच्या मित्रांची नावे सांगितली तर त्यांना ही नाव असेल ना…?” आईने विचारले…

“अगं हो आई , सगळ्यात वेगळा आणि माझ्या आवडत्या रांगत जो दिसतो तो Roll number 21 .त्यात त्याचा रंग निळा दाखविला आहे. आणि जेव्हा पण ते त्यांच्या दैविशक्तीचा उपयोग करतात तेव्हा त्यांच्या डोक्यावर छान मोर पीस येत आणि हातात बासुरी असते…”

आता आईला थोडीफार कल्पना आली होती हे Roll number 21 कोण असेल ह्याची…!

” आई …..Roll number 21 ला क्रिश असे म्हणतात…” अर्चित हसत हसत म्हणाला …

” ओ ssss ,आपल्या घरातील कृष्ण म्हणजे
Roll number 21 क्रिश आहे तर….” आईने अर्चितला जवळ घेत त्याचे लाडाने गाल ओढत छानसा पापा घेतला, Roll number 21चा अंक आटपात तिच्या जन्माष्टमीच्या तयारीला लागली…

( देवाची अनेक रूपे असतात. त्यातलाच एक मुलांचा मनोरंजना साठी बनवलेला ” क्रिश ” . कसा वाटलं Roll number 21चा प्रवास मला सांगायला विसरु नका..)

धन्यवाद…!

©नेहा खेडकर✍❤

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत