Single Child…. आई मी एकटा का आहे.. ??

Written by

आई मी एकटा का आहे?सिंगल चाईल्ड        ©️जयश्री कन्हेरे -सातपुते #$$$#नवीन विचार माझे सामाजिकलेखमालिका #$$$#
कावेरी आणि विनीत याच्या संसारवेलीवर उमललेलं फूल म्हणजे पार्थ.. घरी सगळेच सासू, सासरे, दीर, जाऊ नणंद… नणंदेचेही लग्न झालेले…सर्वाना दोन दोन मूल होती…

नोकरीं निमित्ताने कावेरी आणि विनीत कुटुंबापासून लांब राहायचे. लांब म्हणजे बरेच लांब.. त्यामुळे गावाला जायचं म्हंटल तर 8दिवस सुट्ट्या टाकण्याशिवाय त्यांना दोघांनाही पर्याय नसायचा..

     आई -बाबांना विनीत बोलवायचा इकडे राहायला पण त्यांना काही त्यांच घर सोडून फार दिवस करमायचं नाही… आले तरी 15दिवस राहायचे त्यानंतर त्यांना त्याच्या घराची ओढ लागायची..

खरंच आहे ते अख्ख आयुष्य ज्या घरात, ज्या गावात त्यांनी घालवल त्यांना दुसरीकडे कस राहायला आवडेल, नाही का? गावात चार लोक ओळखीचे दिसलें की बोलणं व्हायचं… शेजारणी आल्यावर विनीतच्या आईचा पण वेळ कसा निघून जायचा कळायचं नाही.. त्यामुळे हे विनीत कडे राहायला तयार नव्हते..

  पार्थ झाला.. त्याला बघायला घरी कुणी नाही. पाळणाघरात ठेवावं त्याला व नोकरीं करावी तें एका आईच्या मनाला पटत नव्हत…. त्यामुळे ममतेपुढे हतबल झालेल्या आईने नोकरीं सोडली. (अशावेळी जर सासू -सासरे असते त्यांच्याजवळ तर तिला नोकरीं सोडावी लागली नसती )

    कावेरी पूर्ण वेळ आई म्हणून वावरू लागली.. हळू हळू पार्थ मोठा होत होता…कावेरी व विनीत यांचा दुसऱ्या बाळाचा काही विचार नव्हताच.. आधीच ठरलेलं त्यांच एकच बाळ मग तें काहीही होवो.. मुलगा किंवा मुलगी आपणं एकच बाळ राहू दद्यायचं दुसरं होऊ द्यायचं नाही.. नोकरीची कावेरीची आवड जपता यावी यासाठी हा निर्णय होता.. दोन मुलांन मधे गुंतल्यावर कदाचित तिला तिच्या आवडी जपता येणार नाही.. हा शुद्ध दृष्टिकोन होता विनीतचा.

पार्थ शाळेत जायला लागला… इकडे कावेरीने देखील जॉब शोधला.. सगळं मस्त चाललं होत.. पार्थ आता.. पहिल्या वर्गात जायचं.. बुक्स मधे फॅमिली विषयी लिहायला लावायचे.. आई -बाबा, आजी -आजोबा, काका -काकू, आत्या -काकाजी, सगळं लिहायचा पण बहीण /भाऊ या जागा रिकाम्या सोडायचा..

आई मला भाऊ किंवा बहीण का नाही? मी एकटा का आहे. माझ्या क्लास मधे सगळ्यांना आहेत बहीण /भाऊ.. मलाच का नाही”..पार्थ

आहेत न तुला बहीण.. भाऊ काकाचे,आत्याचे, मामाचे, मावशीचे मुल.. मुली हे तुझे बहीण भाऊच आहेत न.. कावेरी

नाही.. आई.. तें सख्खे नाही आहेत.. माझे स्वतःचे नाही… तें इथे नाही राहत आपल्या सोबत. माझे बहीण -भाऊ असते तर तुला मम्मी.. पप्पाला पप्पा म्हंटल असत... मला माझ स्वतःचं बहीण /भाऊ पाहिजे “…. पार्थ.. 

कावेरीने त्याला टाळलं कसतरी… पण त्याच्या बाल मनाला तें पटलं नव्हतं…

 पार्थ मोठा होत होता .. आता तर तो जरा जास्तच मागे लागला कावेरीच्या. कारण शहरात मुले खेळायला येत नाहीत…. दिवसभर खेळणी, टीव्ही आणि अभ्यास… इतकंच काम होत पार्थला… आई -बाबा थकून यायचे त्यामुळे तेही सोबत खेळायचे नाही… आजी -आजोबा पण सोबत नव्हते. अशावेळी “मला बहीण /भाऊ असता तर आम्ही दोघे खेळलो असतो ” असा विचार त्याच्या मनात यायचा. त्याचे फ्रेंड्स असेच खेळायचे घरी आपल्या बहीण /भावासोबत.. आणि हा मात्र एकटाच हिरमुसून जायचा… मी एकटा का आहे..? हा विचार करत बसायचा.

आता सात वर्षाचा होत आला पार्थ… वयाबरोबर हट्टीपणा देखील वाढला होता त्याचा.. “मला बाळ आणून दे… कुठूनही आन पण मला माझा भाऊ नाहीतर बहीण पाहिजे म्हणजे पाहिजे ” 

आता मात्र कावेरी व विनीत ला विचार करायला भाग पाडलं होत पार्थ ने.. ??

   मुलगा सात वर्षाचा झालाय..अंतर बरेच होईल दोघात.. कावेरीने तिशी (30+) पार केली.. आपला तर विचार नाही दुसऱ्या बाळाचा पण मुलाचा हट्ट…त्याच काय करायचं..? ??

      एक दिवस बसून कावेरी व विनीत ने मुलाच्या हट्टाचा खोलवर विचार केला.. काय चुकलं त्या चिमुकल्याचं?त्याला खेळायला कुणीतरी हक्काचं हवच न… आपण त्याला या बहीण भावाच्या नात्यापासून दूर का ठेवतोय?  “एकच बाळ हवं ” या आपल्या निर्णयाचा कुठेतरी पुन्हा विचार करायचं ठरवलं दोघांनीही.

विनीत :- मामाचे, काकाचे, मावशीचे, आत्याचे मुलं आहेत.. पण याच बालपण… त्या बालपणात त्याला हक्काचं आपल म्हणता येणार, त्याच्यासोबत वाढणार स्वतःच भाऊ किंवा बहीण असणं गरजेचे आहे.

कावेरी :-आपण फक्त आपला त्रास व आपल्या सोईनुसार एका बाळाचा निर्णय घेतला. पण त्या कोवळ्या मनाचा विचार का नाही केला आपण?

विनीत :- हो ग… शाळेत मित्रांना भाऊ /बहीण आहे.. पण मला नाही. ती का नाही? मी एकटाच का आहे? हा विचार त्याला आला, त्याआधी आपल्याला का नाही आला?(, ✒️ ©जयश्री.
आपण आई -बाबा आहोत… लहान मुलांना त्यांच्याच वयाचे मुलं लागतात खेळायला हे कस विसरलो आपण..

कावेरी :- हो ना… माझी नोकरीं, त्याला बघायला कुणी नाही म्हणून माझ्या मनात असूनही मी तुम्हाला म्हणाले नाही.. मला वाटायचं एक बाळ होऊ द्यावं पण… आपण ठरवलं होत एकच होऊ द्यायचं म्हणून मी काही बोलले नाही..

 विनीत… “आपण पुन्हा विचार करायला हवा.. दुसऱ्या बाळाचा ” आपल्या पार्थ ला हक्काचं, त्याच स्वतःचं भाऊ /बहीण आणायचं आहे.. काय म्हणताय तुम्ही..

विनीत :- बरोबर बोलतेयस तू… आपला निर्णय चुकलाच कुठे तरी… सगळं आहे आपल्याकडे.. दोन मुलांची जबाबदारी घेऊ शकतो आपण. आणि राहिला प्रश्न बाळाला सांभाळण्याचा तर मी सुद्धा तुझ्या बरोबरीने जबाबदारी घ्यायला तयार आहे. एकाला साथीदार दुसरं बाळ हवंच..

      पार्थच्या “मी एकटा का आहे?” या प्रश्नाचं उत्तर त्याला आता मोठा भाऊ बनवूनच देऊया आपण… काय म्हणतेस?

कावेरी :-हो चालेल.. दोघेही मिळून जबाबदारी घेऊया नवीन पाहुण्याची. संसार म्हंटला की तडजोड व काटकसर आलीच. हलाखीच्या परिस्थितीतही लोक दोन मुलं होऊ देतात.. देवाच्या कृपेनें आपली इतकीही हलाखीची परिथिती नाही आहे. थोडी काटकसर करावी लागली तरी चालेल पण पार्थच्या.. एकाकी पानाचं उत्तर त्याला साथीदार आणून द्यायचंच…

विनीत व कावेरी ने दुसऱ्या बाळाचा विचार केला जो त्यांना खूप आधीच घ्यायला हवा होता… जरा उशीर झाला त्यांना… पण निर्णय मुलाच्या दृष्टीने योग्यच घेतला असं मला वाटत…

आणि

तुम्हाला काय वाटत? नक्की सांगा

समाप्त…. ✒️?©जयश्री कन्हेरे सातपुते

          कसा वाटला माझा लेख? जरा यातले विचार न पटणारे असतील नोकरदार स्त्रियांना.. पण कुठेतरी मुलाच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच आपल्याला आपल्या आपल्या “एकच मुल” हवं या विचाराचा पुन्हा विचार करावासा वाटेल.

आधी तीन.. चार बहीण भाऊ असायचे, भांडण व्हायची पण वेळ कसा निघून जायचा कळायचंच नाही.. आता सरकारी आदेश “हम दो हमारे दो “…त्यामुळे दोनच मुले होऊ देतात.. आणि नोकरदार वर्ग, सुट्ट्यांच्या अडचणी, मुलाला सांभाळायला कुणी नाही म्हणून एक बाळ झालं की बस म्हणतात.. योग्य आहे तें..

सर्व जबाबदारी आई वर येते व मग आईची चिडचिड होते. अशा वेळी बाबांनी समजदारी घेऊन या बालसंगोपनात मदत केली तर सिंगल चाईल्ड राहणार नाही व “आई मी एकटाच का आहे? ” हा प्रश्न देखील मुलांना पडणार नाही..

 गरजा खूप वाढल्या आपल्या..त्यामुळे आर्थिक कारण सांगून आपण सिंगल चाईल्ड ठेवलं असं नाही म्हणू शकत.. गरजा मर्यादेत आणून एका.. सोबत दोन अपत्य सांभाळू नक्कीच शकतो.संपूर्ण जबाबदारी आई वर न टाकता वडिलांनी पण बाळाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच स्त्रिया या मुलांची जबाबदारी ही फक्त आपल्यावर असते, सगळं आपल्यालाच बघावं लागत म्हणून दुसरं मूल होऊ देण्यास विरोध करतात. त्यांच योग्य आहे. वडिलांनी जर मानसिक आधार देऊन बालसंगोपनात मदत केली तर सिंगल चाईल्ड राहणार नाही. (©जयश्री)त्या बाल मनाचा विचार करायला हवा आपण..  तेंव्हा पालकांनो विचार करा.. तुमचे सिंगल चाईल्ड तुम्हाला हा प्रश्न विचारण्या आधी की “आई मी एकटा/एकटी का आहे?”

मुलांना हा प्रश्नच पडू देउ नका.. एकाला एक सोबत हवीच.. मुलगा असो वा मुलगी.. दोन बाळ हवीच. त्यांना मोठ होताना एकमेकांचा आधार.. (हे माझ वयक्तिक मत आहे. बाकी प्रत्येकाची आपापली इच्छा. शेवटी ज्याची मूल त्यालाच सांभाळावी लागते. त्यामुळे कुणीही राग मानू नये )

हे विचार काल्पनिक नाही तर.. आजूबाजूच्या, माझ्या निदर्शनास आलेल्या सिंगल चाइल्डच्या मनातील भावना आहेत. ज्या भावना मी या कथेतून तुमच्या प्रयत्न पोहचवण्याचा प्रयत्न केला.. तुमच्यातील बऱ्याच जणांना सिंगल चाईल्ड असेल… (अडचणी असू शकतात, मी नाकारत नाही ) त्या बाळाच्या मनाचा कानोसा घेऊन बघा.. ही विनंती.. उपदेश नाही देत आहे… विनंती करतेय..चुकल्यास क्षमस्व ??

धन्यवाद ?तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत. शेअर करायचा असेल तर नावासहित शेअर करा.नावाशिवाय शेअर केल्यास कायदेशीर कार्यवाही केल्या जाईल. ✒️?©जयश्री कन्हेरे सातपुते 

Article Categories:
सामाजिक

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा