Social Media (घातक अस्त्र)

Written by

Social Media (घातक अस्त्र)

            सुहास हा मध्यमवर्गीय घरातला शांत आणी एकूलता एक मुलगा त्याच्या आईवडीलांना. त्यामुळे साहजीकच त्याच्या घरच्यांच्या त्याचाकडून भरपुर अपेक्षा. तो सुरवातीपासुनच मन मारून जगत असे. त्याला मित्र मैत्रीणी कमी पण वयात आल्यावर त्यालाही वाटायच की, इतर मुलांप्रमाणे त्यालाही त्याची हक्काची girlfriend हवी. जी त्याचाशी आणी तो तिचाशी सर्व की शेअर करेल, झगडेल प्रसंगी एकमेका शिवाय राहणार पण नाही. परंतु यामध्ये त्याची एक अट ही होती की दोघांनी लग्न न करण्याची. त्याला फक्त Girlfriend गरजेपुरती हवी होती.

कालांतराने सुहासला सरकारी नौकरी मीळाली पण त्याचा शोध काही संपता संपेना आणी त्यासाठी त्यानी चक्क फेसबुकचा आधार घेतला, आणी त्यात तो यशस्वी पण झाला. आधी मैत्री आणी मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ नाही लागला. दोघ पण दिवस रात्र, तासनतास Social Media चा आधार घेत एकमेकासोबत वेळ घालवत असत.‍ कधीही एकमेकांना प्रत्यक्षात न बघता, कुठलीही माहीती न घेता तो तीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. कोण, कुठली त्याला त्यातले काहीच माहीत नाही.

दिवसामागुन दिवस गेले, मुलीची गरज संपली की तीचा केवळ टाईमपास म्हणा ती त्याला टाळू लागली. नंबर ब्लॉक, सगळे संपले, सुहास गेला depression मध्ये, त्याचे होते गेले सर्व काही संपुन गेले, आणी वेळ आली नैराश्याच्या गर्तेत जाण्याची. आणी बघता बघता तो पूर्ण नैराश्यात त्याचे जीवन संपवुन बसला.‍

मित्रांनो, सांगायच एकच की, Social Media हा फक्त एक माध्यम आहे पण्‍ त्याला सोपवुन तुम्ही तुमचे जीवन वाया नको जाऊ दया. त्याचा वापर फक्त एक मर्यादित ठेवावा. कुणाला न बघता तुम्ही त्याला तुमचे सर्वस्व नको सोपवा.

सरिता खरबडे पुनसे

प्रतिक्रिया व्यक्त करा