" प्रसाद जा या तिघींसाठी छान साड्या घेउन या तुम्ही दोघ जाऊन. जातांना माझ्याकडुन पैसै घेउन जा. तू नको खर्च करू." आई म्हणाली.
आकांक्षा ताई आणि सायली दोघी किचन सांभाळत होत्या. साधना बाईंनी प्रसादला त्याच्या खोलीत बोलावल होत. पैसै देण्यासाठी.
" थँक्यु प्रसाद."
त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत साधना बाईं म्हणल्या.
त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत साधना बाईं म्हणल्या.
" का ? काय झालं.?"
प्रसाद ने विचारलं.
प्रसाद ने विचारलं.
" मला समजुन सांगण्यासाठी. माझं मन न दुखवता. मी नसले तरी तु मुलीचं माहेर पण करशील. मला माहित आहे. पण पुढच्या आठवड्यात आपण तूझ्या आत्याला माहेर पणाला बोलावू. हे नाहीत म्हणून काय ताईंच माहेर तुटणार नाही."
" खुप मोठा झाला रे. आईची चुक, तिला न दुखवता तिला सांगितली. तिचा मान ही राखला." प्रसाद नुसताच हसला.
थोड्या वेळाने प्रसाद आणि मिनाक्षी साडी आणायला मार्केट मध्येगेले.दोघच फिरायला गेले. आकांक्षा ताई आणि सायली नी किचन सांभाळल होत. आईने राघव सह सगळ्या नातवंडांना सांभाळलं होत.
त्या दिवशी रात्री त्या तिघीनी मिळुन घरातली काम केली. आज राघव देखील साधना बाईंच्या सोबत झोपला होता.
त्या दिवशी रात्री त्या तिघीनी मिळुन घरातली काम केली. आज राघव देखील साधना बाईंच्या सोबत झोपला होता.
रात्री मीनाक्षी लवकरच बेडरूम मध्ये आली. पण आज ती थकलेली नव्हती. आल्या आल्या प्रसादच्या मिठीत झेपावली. मगाच पासुन मनात असणारा प्रश्न विचारणार, त्या आधीच त्याने तिच्या ओठावर बोटं ठेवलं.
" मला माहीत आहे तुला काय विचारायचं आहे? "
तिने नुसतेच डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितल.
तिने नुसतेच डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितल.
" आईने तुला न विचारता परस्पर तूझ्या वस्तू तिला दिल्या. हे तुला आवडलं नव्हत. पण आईच मन राखण्यासाठी तु त्यांना दिलं. पण तरी देखील या वस्तू या बॉक्स मध्ये कशा ? "
" आज आई ने राघव सह सगळ्या नातवंडांना सांभाळलं ? "
" माहेरी आल्यावर त्या दोघी ना कामाला हात लावू न देणाऱ्या या दोघींना आज आईने किचन मध्ये कस काय काम करायला सांगितलं ? "
" आज आपण दोघेच कसे बाहेर गेलो. तुझ्या आवडीने तिघिंच्या साठी साड्या आणल्या ? दरवेळी तर आई आणि ताई जाऊन घेउन येतात."
प्रसाद च्या एकेक प्रश्नावर तिचे डोळे मोठे होत होते. तिला एकावर एक धक्के बसत होते.
प्रसाद च्या एकेक प्रश्नावर तिचे डोळे मोठे होत होते. तिला एकावर एक धक्के बसत होते.
" मी फक्तं आईला समजावून सांगितल. ताई आणि सायली च माहेर जपायला. आता ते कस ते आता सांगू का ? "
" या माझ्या लाडक्या बायकोचे लाड करू."त्याने मादक आवाजात विचारलं. तिने झटकन लपवलं स्वतः ला त्याच्या कुशीत.
" वेडा बाई. मला कसं कळलं. हे विचारते. राणी तुझ्या प्रेम करतो. तु बोललेल समजत. तुझ्या हसऱ्या चेहऱ्या मागचं मन जाणतो मी. आणि हे तुझे चॉकलेटी डोळे आहेत मला. तुला काय म्हणायचं आहे ते सांगायला."
तिच्या गालावर प्रेमाची मोहोर उमटवत प्रसाद म्हणाला.
तिच्या गालावर प्रेमाची मोहोर उमटवत प्रसाद म्हणाला.
आज समाधानाने आकांक्षा आणि सायली ताई बोलतं बसल्या होत्या. मुलं आजीच्या खोलीत झोपली होती.
साधना बाईंनी उद्या ताईंना फोन करून माहेर पणाला बोलवायचं ठरवल होत. त्या त्यांच्या डायरी मधे ताईंचा नंबर शोधत होत्या. त्यांना मनापासून वाईट वाटतं होत. प्रसाद च्या वडीलांना जावून दोन वर्ष झाली. आणि मी माझ्या नणंद बाईंचा नंबर माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून काढून टाकला.
त्या देखील या घरच्या मुलगी आहेत. मी त्याचं माहेर जपायला हवं. माझ्या मुलीचं माहेर माझी पुढची पिढी जपेल.
हेच तर असतात संस्कार जे आधीच्या पिढी कडून पुढच्या पिढी कडे सोपवले जातात.
त्या नंतर दोन दिवस सायली आणि आकांक्षा ताई दोघी मीनाक्षी सोबत तिला मदत करत होत्या. आई ने देखील मुली आणि सुन यांच्यात फरक केला नाही. दोन दिवस माहेरी राहुन त्या दोघी हसऱ्या चेहऱ्याने सासरी गेल्या. यावेळी मीनाक्षी ने मनापासून त्यांचं माहेर पण केलं होतं.
आई ने देखील प्रसाद च्या आत्याला माहेर पणाला बोलावल होत. आनंदाने तिच माहेर पण केलं होत दोन दिवस.
दोन महिन्यांनी,
" आई पुढच्या आठवड्यात होळी पौर्णिमा आहे. पुरण पोळी करायची आहे. सायलीला बोलावू. त्यांना फार आवडते गरम गरम पुरण पोळी." मीनाक्षी स्वतः हुन म्हणाली.
" आई आकांक्षा ताईना पण बोलावू. आता आंबे यायला लागले आहेत. तर एक दिवस पुरण पोळी आणि आमरस चा बेत करू."
किराणा सामानाची यादी करत मीनाक्षी म्हणाली. साधना बाईंनी नुसतीच मान हलवली. त्यांना आज प्रसाद ने म्हणालेल पटलं होत.
" आई वहिनी आहे. म्हणून आई वडील भाऊ यांच्या नंतर एका मुलीला तिच माहेर असत."
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा