आठव्या इयत्तेपासून वाचायला सुरुवात झाली. वयाच्या मानाने प्रचंड वाचन मग अभिरुची झालं. अकरावीत गेल्यानंतर काहीतरी सुचू लागलं. मराठीच्या सरांनी कौतुकाची थाप दिली आणि लिहायला लागलो. शब्द जुळवणं म्हणजेच कविता असं समजणारा मी मराठीचा पाईक झालो.मराठीच विस्जय घेवून एम.ए. आणि बी .एड ही केले. अभ्यास वाढला .भाषा आत्मसात केली .आज जो काही आहे तो मायमराठीमुळेच. आता नित्य शब्दात रमतो...वाचन आणि लेखन हाच ध्यास.कविता ,गझल ही खासियत.